नागरिकांना अ‍ॅपद्वारे गोव्याच्या नियोजन प्रक्रियेस मदत करता येणार

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

गोव्यातील स्थानिक संसाधने ओळखून ग्रामीण भागातील नियोजन प्रक्रियेस मदत करण्यासाठी नागरिकांनी व पर्यटकांनी योगदान द्यावे या उद्देशाने अ‍ॅक्ट फॅार गोवा या सामाजिक संस्थेने नवीन उपक्रम सुरू केला आहे. याकरिता मोबाईल अ‍ॅपचा उपयोग करण्यात येणार आहे

गुगल मॅप व रेडडिट कडून प्रेरणा घेऊन, गोव्यातील १९१ ग्रामपंचायती,स्वयंसेवी संस्था तसेच स्थानिक संसाधने ओळखून ग्रामीण भागातील नियोजन प्रक्रियेस मदत करण्यासाठी नागरिकांनी व पर्यटकांनी योगदान द्यावे या उद्देशाने अ‍ॅक्ट फॅार गोवा या सामाजिक संस्थेने नवीन उपक्रम सुरू केला आहे.

हे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता मोबाईल अ‍ॅपचा उपयोग करण्यात येणार आहे. यासाठी नाइनस्टॅक्स ही संस्था सहकार्य करणार आहे. या अ‍ॅपद्वारे कोणालाही खड्डेमय रस्ते, रस्त्यावरील कचरा, हेरिटेज साइट्स, गोव्यातील कचऱ्याच्या पुर्नप्रक्रियेचे स्पॉट्स किंवा जलस्त्रोत किंवा या ठिकाणी उद्भवणाऱ्या समस्यांना टॅग करता येऊ शकतात.

मूळ अमेरिकन पण गोव्यात स्थायिक झालेले फर्ग्युसन म्हणाले, “सर्वसाधारणपणे आपल्याकडे सामाजिक क्षेत्रात माहितीचा अभाव असतो. स्थानिक समुदायाविषयी पुरेशी माहीती उपलब्ध नाही, ती असल्यास धोरण किंवा योजना तयार करणे अधिक सोपो होते. गोव्यामध्ये ग्रामपंचायतींच्या समित्या विकास योजना तयार करतात ज्याच्या आधारे पंचायतींना राज्य व केंद्राकडून निधी मिळतो. डेटाचा अभाव आणि योजना पूर्ण करण्यास उशीर झाल्यामुळे अनेकदा या निधी न मिळाल्याने योजना अपूर्ण राहतात."
 
नाईनस्टॅकने सीएसआर उपक्रमांतर्गत हे अ‍ॅप विकसित केले आहे. अ‍ॅपला अधिक सक्षम बनविण्यासाठी गुगल डेव्हलपर गटाशी बोलणी सुरू असल्याचे सहसंस्थापक आरोन फर्नांडिज यांनी सांगितले.

संबंधित बातम्या