Cold Milk Benefits: उन्हाळ्यात थंड दूध पिण्याचे जबरदस्त फायदे

Summer Care Tips: उन्हाळ्यामध्ये कोल्ड ड्रिंक्ससह तुम्ही थंड दुधाचे देखील सेवन करू शकता.
Cold Milk Benefits
Cold Milk BenefitsDainik Gomantak

उन्हाळ्यात गरम दूध कोणालाच प्यावेसे वाटणार! पण जर ते थंड असेल तर आवडीने दूध पिल्या जाते. एक ग्लास दुधाचा फायदा प्रत्येक मुलापासून ते वृद्धांपर्यंत होतो. आपल्या देशातील प्रत्येक घरात दुधाबद्दल वेगवेगळ्या समजुती आहेत. दुधात प्रोटीन, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन डी आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात थंड दूध पिणे अधिक आरोग्यदायी असते. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. चला जाणून घेऊया थंड दुध पिण्याचे फायदे कोणते आहेत. (Cold Milk Benefits News)

* पोटाची जळजळ शांत करते
जर तुम्हालाही पोटात जळजळ होत असेल किंवा अॅसिडिटीची समस्या असेल तर तुमच्यासाठी थंड दूध घेणे चांगले राहील. जर तुम्हालाही पचनाची समस्या असेल तर तुम्ही थंड दुधात इसबगोल मिसळा आणि तुम्हाला लगेच आराम मिळेल.

* वजन कमी करण्यास फायदेशीर
थंड दुधाच्या (Milk) सेवनाने तुमचे वजन नियंत्रणात राहते. थंड दुधात आढळणाऱ्या कॅल्शियममुळे तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारते. यामुळे शरीरात कॅलरीज जास्त जळतात. तसेच थंड दूधाचे सेवन केल्यावर पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते.यामुळे भूक लवकर लागत नाही.

Cold Milk Benefits
Home Decor Ideas: 'या' झाडांमुळे घराला मिळेल मस्त लुक

* निरोगी त्वचेसाठी फायदेशीर
थंड दुधामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरलेले असतात. यामुळे तुमच्या शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवतात. उन्हाळ्यात तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्यामुळे तुमची त्वचा (Skin) चमकदार दिसते.

* भूक नियंत्रित ठेवते

जेवल्यानंतरही तुम्हाला सारखी भूक लागत असेल तर तुम्ही थंड दूधाचे सेवन करू शकता. तुम्ही थंड दूधात ओट्स मिसळूनही सेवन करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com