व्यवसाय करण्याच्या विचारात आहात; मग ही बातमी वाचाच; कमी भांडवलात मिळेल लाखोंचा नफा

दैनिक गोमंतक
मंगळवार, 20 एप्रिल 2021

स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या शोधात आहात तर करा ही आगळीवेगळी तुळशीची शेती करा आणि कमवा भरपूर पैसे कमवा. कोरोना काळात  अनेकांचे जॉब गेले आहेत आणि सर्व जण स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या  मागे आहेत.

स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या शोधात आहात तर करा ही आगळीवेगळी तुळशीची शेती करा आणि कमवा भरपूर पैसे कमवा. कोरोना काळात  अनेकांचे जॉब गेले आहेत आणि सर्व जण स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या  मागे आहेत. मग तुम्ही पण जर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात आहात तर ही बातमी तुमच्या साठी अतिशय उपयुक्त आहे.  या साठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही घरीच तुळशीची शेती करून भरपूर पैसे कामवु  शकता. (Considering doing business; Then read this news; With less capital you will get a profit of lakhs)
    
- तुळशीच्या शेतीद्वारे कमी खर्चात तुम्ही लाखो रुपये कमाऊ शकता. 

तुळशीचे महत्व :-  तुळस ही प्रत्येकांच्या दारासमोर असतेच. हिंदू धर्मात तर तुळशीला खूप महत्व आहे.  तुलशीमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे तुळशीची सतत मागणी वाढत आहे. सध्याच्या महामारीच्या परिस्थितीमध्ये  तुळशीला खूप महत्व  आले आहे. तुळस रोगप्रतिकारकक्षमता वाढवण्यास मदत करते.  सर्दी-पडसे झाल्यास तुळशीच्या पानांचा काढा प्यायल्यास आराम पडतो. असे तुळशीचे अनेक फायदे आहेत. 

तसेच तुळशीचे झाड प्रत्येकाच्या घरात असतेच. त्यामुळे तुळशीची शेती कारण्यासाठी जास्त भांडवलाची गरज नाही आणि याची मागणी देखील वाढत आहे.  या महारामारीच्या काळात अनेक लोकांचा काल हा आयुर्वेदाकडे आणि नैसर्गिक जडीबुटीकडे वळला असल्याने तुळशीच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिथितीत जर आपण हा व्यवसाय  करायला सुरुवात केली तर भरपूर पैशाची कमाई होऊ शकते. 

ही शेती करण्याकरीता  आपल्याला फक्त १५०००  रुपये खर्च करण्याची गरज आहे. हे पीक पेरणी झाल्यानंतर ३ महिन्यानंतरच तीन लाख रुपयांना विकले झाते. पतंजली, डाबर , वैद्यनाथ या आयुर्वेदीक कंपन्यांनी तुळशी करारात शेतीचा करत आहेत .
 
जुलै महिन्यात तुळशीची लागवड गेली जाते,  तुळशीच्या शेतीसाठी हा काळ उत्तम मानला जातो. लागवडीनंतर लगेच सिंचन करणे गरजेच  आहे. तसेच गरजेनुसार पाणी द्यावे,  पिकांच्या कापनी आधी सिंचन थांबवले पाहिजे.  झाडांची पाने मोठी झाली की त्याची कापणी केली झाते. योग्य वेळ पाहून कापणी  केल्यास भरपूर फायदा होतो. तुळशीच्या पिकांची मंडई एजंटच्या मार्फत विक्री करू शकता किंवा थेट बाजारात जाऊन विक्री करू शकता. कराराची शेती करणाऱ्या कंपन्यांच्या मार्फत त्यांची शेती करून विक्री करू शकता. 

संबंधित बातम्या