सावधान! सतत गरम पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराला होऊ शकते इजा

दैनिक गोमंतक
गुरुवार, 29 एप्रिल 2021

उपाशी पोटी चहा किंवा कॉफी पिणे शरीराला त्रासदायक ठरू शकते. जर तुम्ही तंदुरुस्त राहण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला रोज सकाळी उपाशी पोटी एक ग्लास कोमट पाणी प्यायला सांगतात हे काही प्रमाणात योग्य आहे.

उपाशी पोटी चहा किंवा कॉफी पिणे शरीराला त्रासदायक ठरू शकते. जर तुम्ही तंदुरुस्त राहण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला रोज सकाळी उपाशी पोटी एक ग्लास कोमट पाणी प्यायला सांगतात हे काही प्रमाणात योग्य आहे.  सकाळी- सकाळी गरम पाणी पिणे शरीराला फायद्याचे मानले जाते हे तर आपण सर्वजण जाणतो. परंतू तुम्हाला माहितीये का जास्त प्रमाणात/दिवसभर गरम पाणी पिणे तुमच्या शरीराला नुकसानकारक ठरू शकते. जर तुम्ही थोड्या प्रमाणात गरम पाणी पीत असाल तर तुमच्या शरीराला ते लाभदायक आहे. दरम्यान, सकाळी गरम पाणी प्यायल्याने घामावाटे आपल्या शरीरातील घाण निघून जाते. त्याचबरोबर, ते आपले वाढणारे वजन देखील कंट्रोलमध्ये ठेवते. नियमित गरम पाणी पिले तर घशातील जंतू नाहीशे होण्यात मदत होते. परंतू जास्त प्रमाणात गरम पाणी प्यायल्याने शरीराला नुकशान पण होते. ते आपण खाली जाऊन घेणार आहोत. (Constantly drinking hot water can injure your body)

Immunity Booster Food : कोरोनाकाळात पैसे वाचवा, घरच्या घरी पौष्टिक खा - 

1) झोपेची समस्या
जर तुम्ही रात्री झोपताना गरम पाणी प्याल तर तुम्हाला झोपेचा त्रास होऊ शकतो. रात्री कोमट पाणी पिण्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांच्या पेशींवर दबाव वाढू शकतो. त्यामुळे रात्री गरम पाणी पिणे टाळा. 

2)रक्तदाब समस्या
गरम पाण्याचा जास्त प्रमाणात सेवन रक्ताच्या मात्रेला धोकादायक ठरू शकते.  जास्त प्रमाणात गरम पाण्याचे सेवन केल्यास आपल्या एकूण रक्ताची मात्रा वाढते. यामुळे रक्तदाब समस्या उद्भवू शकते.

3) किडनी समस्या
 आपली किडनी शरीरातून जास्तीत जास्त पाणी आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. संशोधन असे सूचित करते की कोमट पाण्यामुळे आपल्या मूत्रपिंडांवर सामान्यपेक्षा जास्त ताण येऊ शकतो.

4) नसा सुजतात 
बरेच लोक तहान नाही लागली तरी गरम पाणी पितात, अशा लोकांना गरम पाणी पिऊन मेंदूच्या नसामध्ये सूज येऊ शकते. म्हणून, जेव्हा आपल्याला तहान लागेल तेव्हाच गरम पाणी प्या. वारंवार गरम पाणी पिल्याने डोकेदुखी देखील होऊ शकते.

5) ओठ जळतात 
गरम पाण्याने ओठ जळतात. म्हणून जेव्हा तुम्ही गरम पाणी प्याल तेव्हा लहान घोटासोबत थोडेसे पाणी प्यावे, अन्यथा तुमचे ओठ जळतील.
 

संबंधित बातम्या