Cooking Tips For Rice : भात बनवताना तुम्हीही या 5 चुका तर करत नाही ना? जाणून घ्या

बदलत्या किचन आणि स्वयंपाकात आपण काही जुन्या गोष्टी विसरत आहोत.
Cooking Tips
Cooking TipsDainik Gomantak

भारतीय लोकांमध्ये भात लोकप्रिय आहे. मोजकेच लोक असतील ज्यांच्या घरी भात तयार होत नसेल. साउथमध्ये तर दररोज एका जेवणात भात तयार केला जातो. इथे विशेषतः दुपारचे जेवण म्हणजे डाळ-भात. पण तरीही आपण भात बनवताना काही चुका करतात. प्रेशर कुकरच्या जमान्यात स्वयंपाकघर सांभाळणारी आपली पिढी अनेक चुका करते.

  • भात बनवण्याची योग्य पध्दत

तांदूळ (Rice) नेहमी वाफवलेला असावा. म्हणजे भात बनवताना ते वाफवले पाहिजे. असे केल्याने भात अधिक चविष्ट होतो.

जर तांदूळ उघड्या भांड्यात शिजवला जात असेल तर तांदूळ पूर्णपणे शिजेपर्यंत त्यातील पाणी काढून टाकू नका. मध्येच पाणी बाहेर काढले तर तांदळातील स्टार्चचे प्रमाण वाढते.

भात बनवताना थोडे मीठ घालावे लागेल. असे केल्याने तांदूळ विरघळत नाही. यासोबतच त्यांची चव देखील वाढते. म्हणजेच चपातीची चव वाढवण्यासाठी पीठ मळताना जसे थोडे मीठ टाकले जाते, त्याचप्रमाणे भात बनवताना थोडे मीठ घालावे.

Cooking Tips
Diabetes Care: मधुमेह असणाऱ्यांसाठी 'हा' पांढरा पदार्थ ठरतो फायदेशीर
  • भात बनवतांना कोणत्या चुका होतात

तांदूळ धुतल्यानंतर लगेच शिजवू नये. त्याऐवजी, ते शिजवण्यापूर्वी किमान 10 मिनिटे भिजत ठेवावे. असे केल्याने भाताची चवही सुधारते आणि भाताला शिजवायला कमी वेळ लागतो. त्याचा वेळ आणि गॅस दोन्हीची बचत होते.

भात बनवताना त्यात मीठासोबत थोडे देशी तूप टाका. असे केल्याने भाताची चव खूप वाढते आणि भाताला चिकटत नाही.

तांदूळ बनवताना शक्यतो उघड्या भांड्यात शिजवण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच कुकरमध्ये भात करणे टाळावे. तांदळातील स्टार्च काढून त्याचे वेगळे सेवन करणे आरोग्यदायी असते. यासोबतच भात खाल्ल्याने वजन वाढण्याची तक्रार असेल तर तीही दूर होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com