Post Covid Side Effects: कोरोनामुळे जाऊ शकतो आवाज

व्होकल काॅर्डचा (vocal cords) एक भाग संसर्गामुळे खराब होत आहे
Post Covid Side Effects: कोरोनामुळे जाऊ  शकतो आवाज
Post Covid Side Effects: कोरोनामुळे जावू शकतो आवाज Dainik Gomantak

कोरोनामुळे अनेकांना घशाची (Throat) समस्या उद्भवत आहे. यामुळे अनेकांनी आपले आवाज गमावला आहे. व्होकल काॅर्डचा (vocal cords)एक भाग संसर्गामुळे खराब होत आहे. व्होकल कार्डला रक्तपुरवठा (Blood supply) करणाऱ्या शिरा आणि धमण्यामध्ये अडथळा निर्माण झाल्याने बोलण्याची क्षमता कमी होते. तर अनेक लोकांमध्ये बोलण्याची क्षमता हरवून बसतात. तज्ञ त्याला कोविड व्होकल न्यूरोपॅथी (Covid vocal neuropathy) म्हणतात. सामान्य भाषेत याला घशाचा लकवा (Paralysis) म्हणतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर (Coron second wave) घशाची समस्या असलेल्या रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे. एका संशोधनानुसार आतापर्यंत 40 पेक्षा अधिक रुग्ण (Patient) आढळून आले आहे. यात एका डॉक्टरचा देखील समावेश आहे.

Post Covid Side Effects: कोरोनामुळे जावू शकतो आवाज
Eye Care: दृष्टी वाढवण्यासाठी करा 'या' 3 ज्यूसचे सेवन

* व्हेंटिलेटरवर अधिक काळ राहणे

तज्ञांच्या मते व्हेंटिलेटरवर अधिक काळ राहिल्याने घशाच्या समस्या निर्माण होऊ शकते. किंवा हाय फ्लो फ्लो नझुल कॅन्युलामुळे होऊ शकते. यात घशाच्या आत एक नळी घातली जाते. ही नळी व्होकल काॅर्डच्या मध्यभागी टाकली जाते. हा उपचार बराच वेळ चालतो. यामुळे संसर्ग होऊन व्होकल काॅर्डचा एक भाग खराब होण्याची शक्यता असते. यामुळे रुग्णांना बोलतांना अडचणी येतात.

* संसर्गामुळे न्यूरोपॅथी होऊ शकते

कोरांनाच्या संसर्गामुळे अनेकांनी आवाज गमावले आहे. कारण याचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो. यालाच व्होकल न्यूरोपॅथी म्हणतात. स्वरयंत्रातील रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण झाल्याने स्वरयंत्र खराब होऊ शकते.

Post Covid Side Effects: कोरोनामुळे जावू शकतो आवाज
Health Tips: आयुर्वेदिक काढ्याच्या मदतीने वाढवा आपली रोगप्रतिकारक शक्ती

*व्होकल कार्डचे दोन भाग असतात

स्वरयंत्रद्वारे आपला आवाज बाहेर येतो. स्वरयंत्राचे दोन भाग असतात. व्होकल काॅर्डच्या दोन्ही बाजू आवाजावर नियंत्रण ठेवतात. व्होकल काॅर्ड म्हातारपणात खराब होण्याची शक्यता असते. पण कोरोना संसर्गामुळे ही समस्या तरुणपिढीमध्ये अधिक दिसून येत आहे. एक व्होकल काॅर्ड खराब झाल्यामुळे आवाजाची पातळी मंद होते.

* उपचारातून आवाज परत येतो

तज्ञांच्या मते या समस्येवर उपचार होऊ शकते. व्होकल काॅर्डचा खराब भाग चांगला होऊ शकतो. स्वरयंत्राचा वापर करून आवाज परत येतो. पण ही समस्या पूर्णपणे नीट होत नाही.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com