Coronavirus: लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे का?

Coronavirus: लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे का?
Coronavirus

Coronavirus: सध्या कोरोनासंदर्भात(Covid-19 Question) बरेच प्रश्न लोकांच्या मनात डोकावत असतात. कारण ही परिस्थीती आणि कोरोना महामारी प्रत्येकासाठी एक मोठ आणि नवीन संकट आहे, त्यामुळे हळूहळू वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहे. अशाच प्रश्नांच्या यादित आणखी एक नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. तो म्हणजे, जर आपण लसीचे दोन्ही डोस(COVID-19 vaccination) घेतले असेल तर कोरोना टेस्ट करावी का? किंवा गरजेची आहे का?

टेस्ट करायची गरज आहे का?

यावर, यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशन (DCD) ने, जर आपल्याला लसीचे दोन्ही डोस दिले गेले असेल तर आपल्याला कोरोना चाचणी करण्याची किंवा स्वत:ला क्वॉरंटाइन ठेवण्याची आवश्यकता नाही. जरी तुम्ही एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तरी तुम्हाला टेस्ट करण्याची गरज नाही. 

टेस्ट करायची आवश्यकता का नाही?

कोरोनावर केलेल्या नव्या संशोधनाच्या आधारे नव्या मार्गदर्शनानुसार, ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना कोरोना संसर्गाचा धोका आणि त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता कमी आहेत. संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, जरी आपल्याला कोरोना झाला तरीही तो इतरांपर्यंत पसरण्याचा आणि त्याची लक्षणं इतरांमध्ये दिसण्याचा धोका कमी आहे. 

कोणाला टेस्ट करायची आवश्यकता असेल?

त्याच बरोबर, सीडीसी म्हणते की, एखाद्या व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर त्याला स्क्रीनिंग करायची गरज नाही. मात्र, साथीच्या रोगाचा धोका लक्षात घेता, बऱ्याच कंपन्या अजूनही ऑफिसमध्ये लोकांना स्क्रीनिंग करायला लावतात. त्याचबरोबर सीडीसी चे म्हणणे आहे की, लसीचे दोन्ही डोस घेतल्यावरही परदेशातून येणाऱ्या अमेरिकन नागरिकांना कोरोना चाचणीचे नकारात्मक प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. 

यामुळे इतरांना धोका आहे काय?

अनेक तज्ञांनी सीडीसीला चाचणी मार्गदर्शक सूचनांमध्ये थोडा बदल करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या आपल्याला होणारी साधी सर्दी आणि कोरोना च्या लक्षणांमध्ये बरीच साम्यता दिसून येते. अशा वेळी कोरोना चाचणी करतांना आरोग्य विभागाचे काम वाढते. पण आपल्या माहिती साठी सांगायचं झालं तर कोरोना विषाणूचा धोका कमी होण्यास सुरवात झाली आहे. भारतासह इतर देशांमध्ये, लसीकरणाची गती वेगाने वाढली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com