कोरोना ; एक वैश्विक महामारी

गार्गी चाफाडकर
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

कोरोना काळामध्ये पृथ्वी स्वतःचे घाव भरीत आहे. प्रदूषणापायी अंटार्टिकावरील ओझोनात पडलेली पोकळी देखील मिटत आहे. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, साऱ्याच नद्या या लॉकडाऊनमुळे नितळ झाल्या आहेत. 

कोरोना काळामध्ये पृथ्वी स्वतःचे घाव भरीत आहे. प्रदूषणापायी अंटार्टिकावरील ओझोनात पडलेली पोकळी देखील मिटत आहे. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, साऱ्याच नद्या या लॉकडाऊनमुळे नितळ झाल्या आहेत. 

शाळांनी, कार्यालयांनी, दुकानांनी  लावले कुलूप. रस्ते, गल्ली, वाटांवरील गजबज आपोआपच झाली चूप. शॉपिंग मॉल्स, भोजनालय सारेच अगदी सामसूम.  मैदान-बागेतील उनाडकी मुलं देखील अचानक गुमसूम. डॉक्टर्स - नर्सेस स्वार्थ न बाळगता मृत्यूलाच आहे ललकारीत. आपल्या मुला-बाळांपासून वंचित राहून मानवसेवेसाठी जीवन अर्पित.

या कोरोना काळामध्ये पृथ्वी स्वतःचे घाव भरीत आहे. प्रदूषणापायी अंटार्टिकावरील ओझोनात पडलेली पोकळी देखील मिटत आहे. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, साऱ्याच नद्या या लॉकडाऊनमुळे नितळ झाल्या आहेत. प्रदूषणग्रस्त हवेत श्वास घेण्याचा उरला नाही धाक. एरव्ही देशासाठी काहीही करायला तयार असलेले घरीच बसायला रडत आहेत. 
                                                                                                     बलात्कार, खून, अत्याचार यासारखे अमानवीय गुन्हे तरी कुठे कमी होत आहेत? आपल्या आधुनिकतेवर ज्यांना घमेंड होता त्याच अमेरिकेची कोरोनाने त्रेधा-तिरपीट उडवली. अमेरिका, ब्रिटन, इटली, स्पेन, फ्रान्स सर्वत्रच सध्या कोरोनाची साथ पसरली आहे. घराबाहेर पडणे म्हणजे मृत्यूमुखी पडणे ही दहशत निर्माण झालेली आहे. इथल्या जनतेची गत टीव्ही, मोबाईल, वर्तमानपत्र प्रत्येकावर आहे. फक्त कोरोना व कोरोनाचीच वार्ता सुरू आहे. 

दहा-दहा दिवस घरी न परतणाऱ्या पोलिस-डॉक्टरांवर कसे हो हे लोक दगडफेक करतात? आपल्यावर देखील ओढवलेल्या महामारीच्या काळात हिंदुस्थानाने मानवतेची उपमा सादर केली एच. सी. क्यू. च्या निर्यातीवरील पाबंदी काढून ती गरजू देशांना प्रदानही केली.आपत्कालीन स्थितीत घरी बसायचे स्वतः करू आम्ही परिवर्तन! हेच लोककल्याण समजून करावे जन-जनांचे हित वर्धन..!

संबंधित बातम्या