कोविड-19 ची ताजी स्थिती... गेल्या 24 तासात कोविड-19 चे 11,264 रुग्ण बरे

Pib
शनिवार, 30 मे 2020

30 मे 2020 रोजीच्या आकडेवारीनुसार रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे गेल्या 14 दिवसातील प्रमाण 13.3 दिवस होते ते गेल्या तीन दिवसात वाढून 15.4 दिवस झाले आहे.

नवी दिल्ली, 

गेल्या 24 तासात कोविड-19 चे एकूण 11,264 रुग्ण बरे झाले असून आत्तापर्यंत प्रति दिन बरे होणाऱ्यांच्या संख्येतील हा उच्चांक आहे. त्यामुळे कोविड-19 चे आत्तापर्यंत 82,369 रुग्ण बरे झाले आहेत.

याचा परिणाम म्हणून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 24 तासात 4.51% ने वाढून 47.40% वर पोहोचले आहे. आधीच्या दिवशी ते 42.89% होते.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे 29 मे रोजी असलेली सक्रीय रुग्णांची संख्या 89,987 वरून कमी होऊन सध्या 86,422 झाली आहे. सर्व बाधित रुग्ण सक्रिय वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.

30 मे 2020 रोजीच्या आकडेवारीनुसार रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे गेल्या 14 दिवसातील प्रमाण 13.3 दिवस होते ते गेल्या तीन दिवसात वाढून 15.4 दिवस झाले आहे. मृत्यू दर 2.86% आहे. 29 मे 2020 च्या आकडेवारीनुसार कोविड-19 चे 2.55% बाधित रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत, 0.48% रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 1.96% रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. देशातील चाचणी क्षमता वाढली असून सध्या 462 सरकारी तर  200 खाजगी प्रयोगशाळेत नमुना चाचणी केली जात आहे. आत्तापर्यंत या सर्व ठिकाणी मिळून कोविड-19 च्या 36,12,242 चाचण्या करण्यात आल्या असून 1,26,842 नमुन्यांची चाचणी काल करण्यात आली.

कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी देशातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा विचार करता आजमितीस 942 कोविड समर्पित रुग्णालये असून त्यात 1,58,908 अलगीकरण खाटा, 20,608 अतिदक्षता खाटा, 69,384 ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटा आहेत.  2,380 कोविड समर्पित आरोग्य केंद्रे असून त्यात 1,33,678 अलगीकरण खाटा, 10,916 अतिदक्षता खाटा आणि 45,750 ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटा कार्यरत आहेत. देशात कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 10,541 विलगीकरण केंद्रे आणि  7,304 कोविड सेवा केंद्रे असून तिथे सध्या 6,64,330 खाटा उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने राज्य/ केंद्रशासित प्रदेश/ मध्यवर्ती संस्थांना 119.88 लाख  एन95 मास्क आणि 96.14 लाख वैयक्तिक संरक्षण उपकरणे (PPEs) पुरविली आहेत.

कोविड-19 च्या नवीन जीवनशैलीबरोबर जुळवून घेताना सर्व खबरदारी घेण्याविषयी पुन्हा पुन्हा सांगितले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी शारीरिक अंतर नियमाविषयीच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे; वारंवार हात धुणे आणि श्वसनमार्गाची स्वच्छता राखली पाहिजे;मास्क किंवा फेस कव्हर सार्वजनिक ठिकाणी वापरावे; आणि खोकताना/ शिंकताना शिष्टाचारांचे अनुसरण केले जावे. कोविड -19 चे व्यवस्थापन केवळ तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रत्येकजण व्यवस्थित काळजी घेईल आणि टाळेबंदीच्या काळात शिथिलीकरण गृहीत धरणार नाही.

कोविड -19 संबंधित तांत्रिक मुद्यांविषयी, मार्गदर्शक तत्त्वे आणि सल्ल्याविषयीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया  https://www.mohfw.gov.in/  आणि @MOHFW_INDIA  येथे नियमितपणे भेट द्या.

कोविड -19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19@gov.in  यावर तर इतर प्रश्न ncov2019@gov.in  and @CovidIndiaSeva  यावर पाठवू शकता.

कोविड -19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड -19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील यावर उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या