Cow Milk vs Buffalo Milk : गाईचे दूध अधिक फायदेशीर की म्हैशीचे? मुलांना दूध देण्याआधी हे एकदा नक्की वाचा

म्हैस आणि गाईच्या दुधापेक्षा कोणते दूध जास्त फायदेशीर आहे, याबाबत अनेकदा लोकांमध्ये संभ्रम असतो.
Cow Milk vs Buffalo Milk
Cow Milk vs Buffalo MilkDainik Gomantak

दुधात भरपूर पोषक तत्वे असतात. दूध हे लहान मुलाचे पहिले अन्न आहे. मुलाच्या विकासासाठी, डॉक्टर लहान मुलांना दूध पिण्याची शिफारस करतात. दूध कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे. दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. असे अनेक गुणधर्म दुधामध्ये आढळतात, त्यामुळे त्याला संपूर्ण आहार म्हणतात. मुलांना दिवसातून किमान 2 ग्लास दूध दिले पाहिजे.

वाढत्या वयातही दुधाचे सेवन करावे. मात्र, अनेक वेळा गाईचे दूध प्यावे की म्हैशीचे दूध प्यावे हे समजत नाही. म्हैस आणि गाईच्या दुधापेक्षा कोणते दूध जास्त फायदेशीर आहे, याबाबत अनेकदा लोकांमध्ये संभ्रम असतो. गाय आणि म्हैशीच्या दुधामध्ये कोणते दूध जास्त फायदेशीर आहे ते जाणून घेऊया.

Cow Milk vs Buffalo Milk
Morning Weakness : सकाळी उठल्यानंतरचा थकवा आणि सुस्ती घालवण्यासाठी करा हे उपाय

कोणते दूध जास्त फायदेशीर ?

  • गाईच्या दुधात म्हैशीच्या दुधापेक्षा कमी फॅट असते. गाईच्या दुधात 3-4 टक्के फॅट असते तर म्हैशीच्या दुधात 7-8 टक्के फॅट असते.

  • गाईच्या दुधात प्रथिने कमी असतात तर म्हैशीच्या दुधात जास्त प्रथिने असतात.

  • गायीच्या दुधात कॅलरीज कमी असतात. वजन कमी करण्यासाठी गाईचे दूध प्यावे. तर म्हैशीच्या दुधात जास्त कॅलरीज असतात.

  • गाईचे दूध पातळ असते. यामध्ये 90 टक्के पाणी असते जे शरीराला हायड्रेट ठेवते. त्याच म्हैशीचे दूध घट्ट असते, जे पचायला सोपे नसते.

  • उच्च रक्तदाब आणि किडनीच्या आजाराच्या रुग्णांनी म्हैशीचे दूध प्यावे. म्हैशीच्या दुधात कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते तर गाईच्या दुधात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते.

  • म्हैशीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा जास्त फॅट असते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर तुम्ही म्हैशीचे दूध प्यावे.

  • मुलांना गायीचे दूध प्यायला द्यावे. ते पचायला सोपे असते. गाईच्या दुधात व्हिटॅमिन डी चे प्रमाण जास्त असते.

  • तुम्ही तुमच्या शरीराच्या आणि गरजेनुसार कोणतेही दूध पिऊ शकता. यातून तुम्हाला खूप फायदा होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com