विश्‍वासार्हता म्हणजे लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर लोकमान्य उत्तर गोवा क्षेत्रीय कार्यालयाचे म्हापसा येथी बोशान क्लासिक बोडगेश्र्वर मंदिराजवळील पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांनी फित कापून व दीपप्रज्वलन करून उद्‌घाटन केले.

म्हापसा: लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि., या आस्थापनांनी राज्यात अनेक युवा-युवतींना रोजगार मिळविण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. एक विश्‍वासार्ह संस्था म्हणून गोमंतकीय लोकमान्य सोसायटीकडे पाहत आहेत.

म्हणून गोमंतकीय लोक आपल्या ठेवी त्यांच्याकडे ठेवतात व व्यवहार करतात. यापुढे जाऊन लोकमान्य सोसायटीने गोव्यातील वेगवेगळ्या पध्दतीच्या व्यवहारात गुंतवणूक करावी. राज्य सरकारने प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशीप सुरू केली आहे. जे कुणी यासाठीही गुंतवणूक करू पाहत आहे. त्यांनीही ती करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर लोकमान्य उत्तर गोवा क्षेत्रीय कार्यालयाचे म्हापसा येथी बोशान क्लासिक बोडगेश्र्वर मंदिराजवळील पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांनी फित कापून व दीपप्रज्वलन करून उद्‌घाटन केले. यावेळी लोकमान्यचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर, संचालिका सई ठाकूर बिजलानी, प्रीतम बिजलानी, लोकमान्यचे उत्तर गोवा क्षेत्रीय व्यवस्थापक कुमार प्रियोळकर, बोशान होमचे मालक अमर गायतोंडे, मंगलदास नाईक, शांताराम नाईक, दक्षिण गोवा क्षेत्रीय कार्यालय व्यवस्थापक सुहास खांडेपारकर, अँथोनी आझावेदो यांची उपस्थिती होती. 

दहा हजार कोटी रुपयांचा टप्पा
गाठण्याचे उद्दिष्ट: किरण ठाकुर 

किरण ठाकुर यावेळी म्हणाले की, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.,ने आजव पाच हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. हा टप्पा दहा हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचविण्याचे उद्दीष्ट आहे. लोकमान्य ही देशात वाढलेली सर्वात मोठी मल्टिपर्पज व मल्टिस्टेट शाखा आहे. सर्व संकटावर मात करून आम्ही वाटचाल करीत आहोत. आज लोकमान्यकडे १५०० लोक काम करीत आहेत. त्यात ७०० पिग्मी एजंट आदींचा समावेश आहे. या सोसायटचा फायदा आज ५० हजार कुटुंबियांना झाला आहे. ‘शुभारंभ समृध्द भविष्याचा’ या योजनेंतर्गत २८ महिन्यांच्या कायम ठेवींवर २० हजाराच्या बदल्यात २५ हजार देण्यात येणार असल्याचे यावेळी श्री. ठाकुर यांनी जाहीर केले.

राज्यात कायमस्वरूपी म्युझियम 
उभारणार: किरण ठाकुर 

राज्यात लोकमान्यतर्फे कायमस्वरूपी म्युझियम करण्याचा विचार यावेळी किरण ठाकुर यांनी मांडला. जगातील करन्सी नोटचे, नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात येईल. शिवाय स्वातंत्र्यसैनिकांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून त्यादृष्टीने जागा शोधण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.

चोर्ला घाटातील रस्ता 
त्वरित दुरुस्त करणार:  मुख्यमंत्री 

चोर्ला मार्गावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून येणे-जाणे कठीण होऊन बसले आहे. तो रस्ता त्वरित दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी यावेळी किरण ठाकुर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली. पाहिजे तर टोल घ्या, असेही ते म्हणाले. रस्ता पूर्णपणे खराब झाला असून तो राज्य सरकारच्यावतीने लवकरात लवकर पूर्ण करू, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी आश्‍वासन दिले.

संबंधित बातम्या