काकडी आरोग्य आणि सौंदर्यांसाठी असते फायदेशीर

दैनिक गोमंतक
गुरुवार, 29 एप्रिल 2021

कारण काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. तसेच सॉल्युबल फायबर जास्त असल्यामुळे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतो.

काकडी आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी फायदेशीर आहे. तुम्हाला माहिती आहे का काकडी भाजी नसून एक फळ आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात पोशक तत्वे असतात. काकडी मध्ये अँटीऑक्सीडंट्स प्रमाण अधिक असते. त्यामुळे अनेक आजारपासून रक्षण होते. काकडीमध्ये  कॅलरीजचं प्रमाण कमी असते, म्हणून डाईंट करणारे लोक आहारात काकडीचा समावेश करतात. कारण काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. तसेच सॉल्युबल फायबर जास्त असल्यामुळे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतो. (Cucumber is beneficial for health and beauty)
 
रोगप्रतिकर शक्ति वाढवते -
काकडीचे सेवन रोजच्या आहारात करायला पाहिजे. काकडी मध्ये असलेल्या अँटीऑक्सीडंट्समूळे अनेक आजारपासून रक्षण होते. तणाव, कॅन्सर, हृदयरोग, फुफ्फुस्सांचा रोग या आजारपासून काकडी बाचाव करते. 

तोंडातील दुर्गंधी दूर करण्यासाठी -
तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असल्याची समस्या असेल तर काकडीचा तुकडा तोंडात धरून ठेवावा. त्यामुळे तोंडात दुर्गंधी निर्माण करणाऱ्या जंतूंपासून सुटका होते. तसेच काकडी खाल्याने पोटातील उष्णता कमी होते.   

डिहायड्रेशन कमी करण्यासाठी -
शरीरात पाण्याची पातळी जास्त असणे आवश्यक आहे. शरीरातील सर्व कार्य त्यामुळेच सुरळीत चालण्यासाठी पाणी महत्वाची भूमिका पार पडत असतो. शरीरातील योग्य हायड्रेशनमूळे शरीर निरोगी राहते. पोटाची पचनक्रिया चांगली राहते. काकडी मध्ये 96 टक्के पाणी असते. काकडीच योग्य प्रमाणात आहारात सेवन केल्यास दैनंदिन पाण्याची गरज पूर्ण होण्यास मदत होते. 

Immunity Booster Food : कोरोनाकाळात पैसे वाचवा, घरच्या घरी पौष्टिक खा - 

वजन कमी करण्यास फायदेशीर- 
काकडी खाल्याने वजन कमी होते कारण त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. काकडीचा आहारात  कोशिंबीर, सलेड आणि चटणी म्हणून उपयोग करु शकतो. अगदी रोजच्या नाश्त्यामधील सॅंडविच मध्ये आवर्जून काकडीचा वारत होतो. 
त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर काकडी खाऊन साध्य करू शकता.     

कॅन्सरचा धोका टळतो -
काकडीमध्ये पॉलीफेनोल नावाचा घटक आढळतो यामुळे स्तन, गर्भाशय तसेच प्रोटेस्ट कॅन्सर चा धोका कमी करण्यास उपयुक्त असते. काकडी मध्ये फिओनोट्रीयंट्स असतात त्यामध्ये कॅन्सर दूर करण्याचे गुण असतो. 

काकडीचे इतर फायदे -
उन्हाळ्यात अनेकांची त्वचा कोरडी पडते. काकडीमध्ये सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे त्वचा स्वच्छ राहते. काकडीमध्ये फायबर आणि पाण्याचा चांगला स्त्रोत असल्यामुळे बद्धकोष्टता आणि पचनक्रिया सुलभ होते. काकडीतील सिलिक आणि अँटीऑक्सीडंट्स या घटकामुळे डोळ्याखालील काळे डाग कमी होवून डोळ्यातील उष्णता कामी होते. काकडी खाल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. म्हणून उन्हाळ्यात काकडी खाण्याचा सल्ला दिल जातो.     
 

संबंधित बातम्या