
मेष
ज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या उपयोगी वस्तूंच्या खरेदीमध्ये तुमची संध्याकाळ व्यस्त राहील. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरेल. (Daily Horoscope 16 September)
वृषभ
अतिखाणे टाळा, तुमच्या वाढत्या वजनावर सातत्याने लक्ष असू द्या. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. आज लोक तुमचे अभिनंदन करतील - याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. (Rashi Bhavishya in Marathi)
मिथुन
तुमचे मनमोकळे आणि निडर विचार तुमच्या मित्राला तुमचा गर्व आहे असे वाटून तो दुखावला जाईल. तुमचा शेजारी आज तुमच्याकडून धन उधार मागण्यास येऊ शकतो. तुम्ही त्यांना धन देण्यापूर्वी त्याची विश्वसनीयता जाणून घ्या अथवा धन हानी होऊ शकते. नातेवाईकांना भेट देण्याचा अनुभव तुम्हाला वाटला त्यापेक्षा बरा असेल.
कर्क
जेव्हा तुम्हाला जाणवते की, तुमच्या जवळ कुटुंबियांसाठी आणि आपल्या मित्रांसाठी वेळ नाही तर, तुम्ही दुःखी व्हाल. आज ही तुमची मनस्थिती अशीच राहू शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. आजचा दिवस कुठल्या धार्मिक स्थळाला समर्पित करणे आपली मानसिक शांती कायम ठेवण्याचे सर्वश्रेष्ठ साधन असू शकते.
सिंह
तुमच्या अवतीभवतीचे लोक खूप कामाचा अपेक्षा तुमच्याकडून करतील - परंतु जेवढे काम तुम्ही करू शकता तेवढ्याचेच वचन द्या - आणि फक्त अशा लोकांना खुष ठेवण्यासाठी कामाचा ताण घेऊन दमून जाण्याची गरज नाही. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. गृहशांतीसाठी शुभ आणि पवित्र दिवस.
कन्या
तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे/भागादाराकडे दुर्लक्ष केले तर तो किंवा ती नाराज होतील. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुम्ही तुमच्या जोडीदाराला रोमँटिक डेटवर घेऊन गेलात तर तुमचे नाते अधिक घट्ट होईल. विचारांनीच मनुष्याचे जीवन बनते- तुम्ही एक उत्तम पुस्तक वाचून आपल्या विचारधारेला अधिक सशक्त करू शकतात.
तुळ
तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. आपल्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हे लक्षात ठेऊन आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. आज धार्मिक कामात तुम्ही आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकतात.
वृश्चिक
तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. तुम्ही साजरे करण्याच्या मूडमध्ये असाल आणि कुटुंबातील सदस्य तसेच मित्रमंडळी यांच्यासाठी खर्च करून मजा लुटाल. प्रणयराधनेत गुंतल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दुरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल.
धनु
कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते. एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी अडचण निर्माण करु शकते. तुमचा/तुमची प्रियकर/प्रेयसी दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. एक सरप्राईझ आखा आणि आजचा दिवस तुमच्या आय़ुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल
मकर
जर तुम्ही विवाहित आहे आणि तुमची मुले आहेत तर, ते आज ते तुमच्याशी तक्रार करू शकतात कारण, तुम्ही त्यांना पर्याप्त वेळ देत नाही. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, असं का म्हणतात, ते तुम्हाला आज कळेल. आज काही चिंता तुम्हाला दिवसभर त्रास देऊ शकते. त्याच चिंतेला दूर करण्यासाठी तुम्हाला आपल्या घरच्यांसोबत बोलले पाहिजे.
कुंभ
भीती, चिंता तुमच्या सुखी समाधानी, आनंदी जगण्याला मारक ठरू शकते. आपल्या विचारांमधून आणि कल्पनांमधूनच चिंतेचा जन्म झाला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. या चिंतेमुळेच तुमचा उत्स्फूर्तपणा मारला जातो, जगण्याचा आनंद हिरावून घेतला जातो आणि तुमच्या कार्यक्षमता अपंग होते. म्हणून चिंतेचा निर्माण होण्यापूर्वीच तिला मुळातून खुडून टाका.
मीन
आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी आज तुम्हाला मिळतील. प्रेमापेक्षा अधिक काहीच नाही तुम्हाला ही आपल्या प्रेमीला काही अश्या गोष्टी बोलल्या पाहिजे ज्यामुळे त्यांचा विश्वास तुमच्यात वाढेल आणि प्रेमाला उच्चता प्राप्त होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.