Darsh Amavasya 2022: 'या' दिवशी काय केल्याने दूर होतील आर्थिक संकट

what to do on Darsh Amavasya: कार्तिक महिन्यातील अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्याला काय करावे हे जाणून घेउया.
Darsh Amavasya 2022
Darsh Amavasya 2022Dainik Gomantak

Darsh Amavasya 2022: कार्तिक महिन्यातील अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्या बुधवार 23 नोव्हेंबर 2022 रोजी आहे. या दिवशी पवित्र नदीत आंघोळ करून पूर्वजांना जलाभिषेक करतात. पिंडदान, श्राद्धविधी करतात. यामुळे पितृदोषातून मुक्ती मिळते असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. अमावस्येला कालसर्प दोषातून मुक्त होण्यासाठीचे विधी पण केले जातात.

जर आपल्या घराजवळ पवित्र नदी नसेल तर असेल त्या नदीवर आंघोळ करून अथवा नदीचे पाणी घरच्या आंघोळीच्या पाण्यात मिसळून त्या पाण्याने आंघोळ करावी. आंघोळ केल्यानंतर पितृदोषातून मुक्त होण्यासाठी आवश्यक ते विधी करायला हव्या.

Darsh Amavasya 2022
Budhwar Upay: बुधवारी 'या' गोष्टींनी करा गणपतीची पूजा, घरात राहिल सुख-शांती
  • दर्श अमावस्येला काय करावे

नदीत आंघोळ करून पूर्वजांना जलाभिषेक करावा. पिंडदान, श्राद्धविधी करून पितृदोषातून मुक्त व्हावे.

कालसर्प दोष असल्यास या दोषातून मुक्त होण्यासाठीचे विधी करावेत.

घरातील (Home) सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यावे.

गरजू व्यक्कींना दान करावे.

अन्नदान करावे, गरीबांना कपडे तसेच अंथरूण-पांघरूण दान करावे.

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांची सेवा करावी.

चांगला विचार करणे, चांगली कृती करणे या पद्धतीने पुण्य कर्म करावे.

  • अमावस्या म्हणजे काय? दर्श अमावस्या म्हणजे काय?

पृथ्वीवरून जर रात्री चंद्र दिसला नाही तर त्या तिथीला अमावस्या म्हणतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असलेल्या अमावास्येला सिनीवाली अमावास्या म्हणातात. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या काळात अंशतः चतुर्दशी व अंशतः अमावास्या असेल तर त्या अमावास्येला दर्श अमावास्या, आणि अंशतः अमावास्या व अंशतः प्रतिपदा असेल तर कुहू अमावास्या म्हणतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com