Astro Tips: 'हे' ग्रह कमजोर पडल्याने येते डिप्रेशन, 'या' उपायांनी होईल फायदा

Health Tips
Health Tips Dainik Gomantak

ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्र (Moon) हा मनाचा करक आहे आणि चंद्राचे रात्रीवर पूर्ण नियंत्रण असते. चंद्र कमजोर झाल्यामुळे डिप्रेशन /नैराश्य (Depression) सारखी स्थिती निर्माण होते. याच सोबत चंद्राचा संबंध पाण्याशी आहे. अलिकडे रात्री अंघोळ करण्याचा ट्रेंड वाढला आहे. तसेच, वेळेच्या कमतरतेमुळे बरेच लोक रात्रीच कपडे धुतात. पण, तुम्ही सुद्धा असे काही करत असाल तर जाणूनबुजून तुम्ही कुंडलीतील चंद्र ग्रहाला कमजोर करत आहात.

रात्री अंघोळ करून कपडे धुतल्याने चंद्रासोबत राहूचाही तुमच्यावर नकारात्मक प्रभाव पडू लागतो. ही नैराश्याची प्राथमिक अवस्था आहे.

Health Tips
Goa: काणकोणात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

चांदीच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने चंद्राचे स्थान बलवान होते. याशिवाय दररोज सकाळी शिवलिंगावर दूध आणि पाण्याचा अभिषेक केल्याने तुमच्या मानसिक आरोग्याला देखील फायदा होईल.

ज्योतिषशास्त्राव्यतिरिक्त योग आणि प्राणायाम देखील नैराश्य दूर करण्यात मदत करतात. मकरासन हे योगामध्ये खूप सोपे आसन मानले जाते, ज्यामुळे या समस्येपासून सुटका मिळू शकते.

सेतुबंधासन याला ब्रिज पोस असेही म्हणतात. पाठीवर झोपून केले जाणारे हे महत्त्वाचे आसन आहे. हे आसन रोज केल्याने नैराश्य, चिंता, तणाव यांसारख्या समस्या दूर राहतात. असे केल्याने तुमचे मन शांत राहते आणि शरीरालाही ऊर्जा मिळते.

Health Tips
नव्वदच्या दशकातील LML स्कूटर पुन्हा धावणार, Yamaha RX100,Lambretta पुनरागमनासाठी सज्ज

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com