Dengue Diet: डेंग्यूचा वाढतोय कहर, धोका टाळण्यासाठी या सुपरफूडचा आहारात करा समावेश

Dengue Diet Chart: सध्या राजधानी दिल्लीसह देशभरातील अनेक राज्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.
Dengue
DengueDainik Gomantak

Dengue Diet Chart: सध्या राजधानी दिल्लीसह देशभरातील अनेक राज्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. राजधानीत वेक्टर-बोर्न डिसीज (VBD) प्रकरणांची, विशेषत: डेंग्यूची वाढती संख्या लक्षात घेऊन दिल्ली सरकारने सर्व रुग्णालयांना त्यांच्या 10-15 टक्के बेड आरक्षित ठेवण्यास सांगितले आहे.

त्याचबरोबर, यूपी सरकारनेही डेंग्यूच्या (Dengue) पार्श्वभूमीवर अलर्ट जारी केला आहे. डेंग्यूला हलक्यात घेऊ चालणार नाही. पावसाळ्यानंतर त्यात झपाट्याने वाढ होते. देशात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. पण काही टिप्सच्या मदतीने डेंग्यू टाळता येऊ शकतो. आज आम्ही अशा पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे या आजारात उपयुक्त ठरतात.

Dengue
आवळा आणि कडुलिंबाच्या पानांनी रक्तातील साखर ठेवा नियंत्रित; जाणून घ्या उपाय

दरम्यान, संत्रे हे अनेकांचे आवडते फळ आहे. त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये असलेले पोषक घटक डेंग्यूपासून बरे होण्यास खूप मदत करतात. यामध्ये फायबर तसेच व्हिटॅमिन सी असते. डेंग्यूला रोखण्यासाठीही हा रामबाण उपाय आहे. डॉक्टर डेंग्यूच्या रुग्णांना संत्री खाण्याचा सल्ला देतात.

तसेच, उन्हाळ्यात तुमची तहान भागवणारे नारळ पाणी तुम्हाला डेंग्यूपासून वाचवू शकते. डेंग्यूची लागण झालेल्या व्यक्तीच्या शरीरात पाण्याची कमतरता असते. अशा परिस्थितीत शरीराला हायड्रेट करणे आवश्यक असते. यामध्ये नारळ पाणी खूप फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील द्रवपदार्थांचे नियमन करताना विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करतात.

Dengue
Health Tips : पाणी पिऊनही ठेऊ शकता High Blood Pressure नियंत्रित; जाणून घ्या योग्य उपाय

दुसरीकडे, डाळिंब हे फळ डेंग्यूशी लढण्यासाठी खूप प्रभावी आहे. यामध्ये भरपूर लोह असते, जे रक्तातील प्लेटलेटची संख्या राखण्यास मदत करते. याच्या सेवनाने केवळ डेंग्यूपासूनच बरे होत नाही तर डेंग्यूला टाळताही येऊ शकतो.

शिवाय, डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांना पपईची पाने आणि बिया खाण्याचा सल्ला दिला जातो. आजकाल त्यांच्यापासून बनवलेली औषधेही येऊ लागली आहेत. रुग्णांसाठी पपईची पाने आणि बियांमधून काढलेला रस खूप फायदेशीर आहे, ते बारीक करुन देखील खाऊ शकतात. हे रक्तातील प्लेटलेट्स तयार करण्यास मदत करते.

Dengue
High Blood Pressure कंट्रोल करण्यासाठी पाणी असते अतंत्य फायदेशीर

तसेच, पालक आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की पालकाचे सेवन डेंग्यूशी लढण्यास खूप मदत करते. त्यात भरपूर जीवनसत्त्वे, लोह आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असतात. या गोष्टी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com