Dev Diwali 2022: देव दिवाळीच्या दिवशी करा 'हे' 6 उपाय, दूर होतील पैशाशी संबंधित समस्या

यावेळी देव दिवाळीचा सण 7 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.
Diwali Festival
Diwali FestivalDainik Gomantak

कार्तिक पौर्णिमा हा कार्तिक महिन्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी देशभरात देव देवळीही (Dev Diwali) साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर राक्षसाचा वध करून देवांना स्वर्गात परत केले. या आनंदात देवतांनी या दिवशी दिवाळी साजरी केली. दुसर्‍या मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूने मत्स्य अवतार घेतला.

यावेळी देव दिवाळी 7 नोव्हेंबरला साजरी होत आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी केलेले काही विशेष उपाय विशेष लाभ देतात. या उपायांबद्दल जाणून घेऊया. 

  • देव दीपावलीच्या दिवशी हे उपाय करा 

  • कार्तिक महिन्यात किंवा देव दिवाळीच्या दिवशी घरात तुळशीचे रोप लावावे. या दिवशी भगवान विष्णूच्या चित्रावर किंवा मूर्तीवर 11 तुळशीची पाने बांधावीत. यामुळे घरात कधीही धन-संपत्तीची कमतरता भासत नाही आणि घरातून (Home) गरीबीही दूर होते. 

  • असे मानले जाते की देव दिवाळीच्या (Diwali) दिवशी तुळशीची 11 पाने घेऊन पिठाच्या भांड्यात सोडा. असे केल्याने घरात शुभ बदल दिसून येतात.

  • देव दिवाळी, एकादशी, अनंत चतुर्दशी, देवशयनी, देव उथनी, दिवाळी, खरमास, पुरुषोत्तम महिना, तीर्थक्षेत्र, उत्सव इत्यादी विशेष प्रसंगी विष्णु सहस्रनामाचे पठण केल्याने सर्व बाधा नष्ट होतात. 

Diwali Festival
Tea Fact : चाय के शौकीन! दिवसातून किती वेळा चहा पिणे आहे योग्य? तज्ञांकडून घ्या जाणून
  • नोकरी (Job) किंवा व्यवसायात प्रगतीसाठी देव दिवाळीच्या दिवशी तुळशीला पिवळे कापड बांधावे. असे केल्याने व्यवसायात प्रगती होते आणि नोकरीत बढतीची शक्यता वाढते. 

  • देव दीपावलीच्या दिवशी सत्यनारायणाची कथा केल्याने सर्व संकटांचा नाश होतो आणि जीवनात आनंद येतो. 

  • देव दिवाळीच्या दिवशी गंगेत स्नान केल्यानंतर दिवे दान अवश्य करावे. या दिवशी दिवा दान केल्याने दहा यज्ञ केल्‍याचे फळ मिळते असे मानले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com