God worship: देवपूजा आणि आपण

प्रत्येक माणासाला जीवनात सुख समाधान आणि शांती प्राप्त व्हावी म्हणून देवपूजा हे एक उत्तम साधन आहे.
God worship
God worshipDainik Gomantak

देव पूजा हा आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास यांचा परिपाक आहे. प्रत्येक माणासाला जीवनात सुख समाधान आणि शांती प्राप्त व्हावी म्हणून देवपूजा हे एक उत्तम साधन आहे.हल्लीच्या संघर्षमय काळात आणि आपल्या दैनंदिन कार्यक्रमात देवपूजेसाठी आपणाला जास्त वेळही मिळत नाही. तरीही वेळात वेळ काढून देवपूजा करावी. यथाशक्ती, यथामती आणि मिळतील त्या उपचारांनी देवपूजा मनोभावे केली तर मनाला शांती मिळते, सात्विकपणा वाढते. घरातील वातावरण पवित्र होते, प्रसन्नता प्राप्त होते, आणि आपापली कामे करायला उत्साह मिळतो. वास्तशास्त्रानुसार घराच्या ईशान कोपऱ्यात देवघर प्रतिष्ठित केले पाहिजे.

देवपूजेचे महत्त्व-

देवपूजा करणाऱ्यांना एक प्रकारचे विशेष सामर्थ्य येत असते, वाणीला तेज चढते, अंगीकृत कार्याला यश येते आणि इतरांचाही उत्साह वाढतो आनंद होतो. देवपूजेमुळे शारीरिक, मानसिक आणि आचरणातील दोष दूर होतात. आत्मिक बळ वाढते. आत्मा हाच खरा परमात्मा आहे. तो संतुष्ट असला तरच जीवनाचे सार्थक होते. प्रातःकाली स्नानानंतर देवपूजा करावी. सर्व पूजा सामग्री एकत्र करून, देवासमोर बसावे. पूजेसाठी पूर्वेकडे तोंड करून बसावे, दक्षिणेकडे तोंड करून बसू नये. रेशमीवस्त्र (सोवळे) नसून पूजा करावी. निदान स्नानानंतर धुतलेले वस्त्र नेसून पुजा करावी. पाणी भरलेला पाण्याचा तांब्या आणि पूजेचे साहित्य एकत्र करून घावे. भुशुद्धी करून पूजेला सुरवात करावी.

God worship
Shiva Worship Tips: भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी 'या' गोष्टी कराव्या अर्पण

षोडशोपचारी पूजा-

(१) आवाहन (२) आसन (३) पाद्य (४) अर्ध्य (५) आचमन (६) स्नान (७) वस्त्र- यज्ञोपवीत (८) गंध (९) पुष्प (१०) धूप (११) दीप (१२) नैवेद्य (१३) फल (१४) तांबूल (१५) दक्षिणा (१६) प्रदक्षिणा

पंचोपचारी पूजा-

(१) गंध (२) पुष्प (३) धूप (४) दीप (५) नैवेद्य

पूजेचे साहित्य-

अक्षता, हळद, कुंकू, गुलाल, बुक्का गंध, फुले, तुळशी, दूर्व, बेल, उदबत्ती, निरांजन, कापूर, पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर, साखर नसेल तर थोड गूळ), तांब्या, पळी-पंचपात्री, ताम्हण, अभिषेकपात्र ही सर्व पूजेची भांडी तांब्या पितळेची-शक्य तर चांदीची असावी.

God worship
Worship of Ekadashi : कशी करावी उत्पत्ती एकादशीची उपासना? जाणून घ्या शास्त्रीय पद्धत..

पंचायतन रचना-

बहुतेक कुटुंबाच्या देवघरात देवांचे पंचायतन असते. पंचायतन म्हणजे पाच देवांचे असलेले अधिष्ठान. पंचायतनात शंकर, विष्णु, सूर्य, गणपती आणि देवी हे ते पाच देव असतात.त्यांपैकी आपली मुख्य देवता मध्यभागी आणि बाकीचे चार देव त्याच्या भोवती असतात.देवघरातील देवांच्या मूर्ती काही तांब्याच्या, काही पितळेच्या तर काही चांदी सोन्याच्याही असतात. ताईच देवतांचे टाकही (चांदीचे किंवा सोन्याचे) असतात.

God worship
Benefits of Amla: 'यात' दडलंय चिरतारूण्याचं रहस्य!!

फुले-

त्या त्या ऋतूत येणारी ताजी आणि सुवासितक फुले देवाला वाहावी.

विष्णुला- चाफा, मोगरा, जाई, कुंद वगैरे फुले आवडतात.

शंकराला- पांढरा कण्हेर, बेल, कुंद, धोतरा इ. पांढरी फुले वाहतात.

गणपतीला- दूर्वा, गुलाब, जास्वंद वगैरे तांबडी फुले प्रिय असतात. गणपतीला रक्तचंदनाचे गंध आणि शेंदूर प्रिय असतो.

विष्णु-विठ्ठल-शाळिग्राम- या देवतांना तुळस तर

देवीला सर्व सुवासिक फुले चालतात.

आपल्य कुटुंब प्रामुख्याने देवघरातील देवांची पूजा केल्यावर घरातील अन्य सदस्यांनी शुचिर्भूत होऊन देवाला गंध -फुले-अक्षता वाहून देवाला नमस्कार करावा

पूजेनंतर जप करावा. गीतेचा अध्याय, गुरुचरित्र, गजानन विजय यासारख्या आपल्या आराध्य देवतेची कथा, पोथी यांचे वाचा करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com