Diet Tips: झटपट वजन वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

सकाळच्या नाश्त्यामध्ये (Breakfast) नियमितपणे दूधासोबत 3 ते 4 केळी खाल्ल्याने झटपट वजन वाढण्यास मदत मिळते.
Diet Tips: झटपट वजन वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
Diet Tips: झटपट वजन वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय Dainik Gomantak

आजकालच्या धावपळीच्या जगात आपण स्वता:च्या आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष करत आहोत. यामुळे आपल्याला थकवा आणि अशक्तपणा (Weakness) जाणवतो. विशेष म्हणजे ही समस्या तरुण पिढीमध्ये (Young people) अधिक पाहायला मिळते. अनेक लोक आपल्या आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष करतात. यामुळे त्यांचे आरोग्य अधिक खालवते. तसेच अनेक आजारांना (Diseases) सामोरे जावे लागते. जर तुम्हाला वजन वाढवायचे (Gain weight) असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

* वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

* सकाळच्या नाश्त्यामध्ये नियमितपणे 3 ते 4 केळी दूधासोबत खाल्ल्याने वजन वेगाने वाढण्यास मदत मिळते. तसेच दूधामध्ये मध मिक्स करून नियमित सेवन केल्याने वजन वाढण्यास मदत मिळून आपल्या शरीराची पचनशक्ती वाढण्यास मदत मिळते.

* वजन वाढण्यासाठी खरबूजचे सेवन करावे. तसेच तुम्हाला जर पीनट बटर आवडत असेल तर नाश्त्यामध्ये ब्राऊन बेडला हे पीनट बटर लावून खावे.

* झटपट वजन वाढवण्यासाठी तुम्ही अंड्याचे सेवन करू शकता. कारण अंड्यात मुबलक प्रमाणात प्रोटिन असते. हे आपल्या आरोग्यासाठी लाभदायी असते. तसेच भातासोबत सोयाबीन आणि काही फळभाज्या मिक्स करून सेवन केल्यानेसुद्धा तुमचे वजन वाढू शकते. हे आरोग्यासाठी पौष्टिक असून लाभदायी आहे.

* आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, अशा पालेभाज्यांचे सेवन करावे. तसेच बटाटे, तांदूळ, दही यासारख्या पदार्थांचा समावेश करावा. यामुळे तुमचे वजन झटपट वाढण्यास मदत मिळते.

* आठवड्यातून दोन वेळा तरी आपल्या आहारात पनीरचा समावेश करावा. पनीरमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. तसेच पनीरमध्ये कॅलरीजअधिक असतात. यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत मिळते.

* वजन वाढण्यासाठी हा एक उत्तम पर्याय मानला जातो. निरोगी आरोग्यासाठी 7 ते 8 तासाची झोप घेणे गरजेचे आहे. शरीराला योग्य प्रमाणात आराम मिळाल्यास अन्न पचायला मदत मिळते. यामुळे सुद्धा आपले वजन वाढण्यास मदत मिळते.

* रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे काळे मनुके पाण्यात भिजत घालावे. सकाळी उठून हे मनुके खावेत. सोयाबीन खाल्ल्याने शरीरातील लोह आणि फॅट वाढण्यास मदत मिळते. तसेच आपला अशक्तपणा देखील कमी होण्यास मदत मिळते. शिवाय नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळे आरोग्य निरोगी राहते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com