गोव्यातली टॅटूची दुनिया; जाणून घ्या कलंगुटमधील पाच फेमस टॅटू स्टुडिओ

Priyanka Deshmukh
बुधवार, 31 मार्च 2021

कुठल्याही टॅटू कलाकारांचा आदर केला जातो. गोव्यातही असे काही टॅटू आर्टीस्ट आहेत. गोव्यातील जवळजवळ सर्व किंवा कमीतकमी सर्वोत्कृष्ट टॅटू कलाकारांचे स्टुडीओ नॉर्थ गोवा किनारपट्टीवर आहेत. विशेषतः कॅलंगुट बीच, अशा टॅटू स्टुडिओने भरलेला आहे.

आता पूर्वीसारखे टॅटूला कलंकित केले जात नाहीत. ते आता कला मानले जातात. किशोरवयीन बंडखोरी, आक्रमकता किंवा शॉर्टसाइटनेस केवळ व्यक्त करण्याऐवजी आज कुठल्याही टॅटू कलाकारांचा आदर केला जातो. गोव्यातही असे काही टॅटू आर्टीस्ट आहेत.  गोव्यातील जवळजवळ सर्व किंवा कमीतकमी सर्वोत्कृष्ट टॅटू कलाकारांचे स्टुडीओ नॉर्थ गोवा  किनारपट्टीवर आहेत. विशेषतः कॅलंगुट बीच, अशा टॅटू स्टुडिओने भरलेला आहे, ही एक उल्लेखनीय बाब आहे. गोव्यातील असे 5 उत्तम टॅटू कलाकार जे आपल्याला उत्तम टॅटू काढून देतील आणि आपल्या आरोग्याचीही काळजी घेतील. 

ड्रॅगन इंक टॅटू स्टुडिओ, कॅलंगुट, गोवा

May be an image of one or more people, tattoo and flower

जगातल्या प्रत्येक देशात टॅटूची फॅशन आहे आणि प्रत्येक देशाचा टॅटूचा वेगवेगळा इतिहास आहे. आपल्याकडे ग्रामीण भागांत आधी गोंदवण्याची पूर्वापार प्रथा होती आणि काही भागात तर अजूनही आहे. या टॅटू ची क्रेझ ही हल्ली नाही तर कितीतरी दशका आधी रुजली आहे. परंतु तेव्हा टॅटू काढण्याला एक वेगळच महत्व होत त्यासाठी  विशेष चिन्ह होती. प्रत्येक चिन्हाला महत्व होत.

क्रिश टॅटू स्टुडिओ, कॅलंगुट, गोवा

May be an image of one or more people, tattoo, deer and flower

मात्र अलीकडे कुठल्याही गोष्टीच महत्व नाही तर त्याची फॅशन होत जाते आहे. आपल्याकडे गोंदवण्याची प्रथा ही ग्रामीण भागापुरती मर्यादित होती. प्रामुख्याने गोंडी समाजामध्ये गोंदण्याचा प्रकार आपल्याला खूप जास्त प्रमाणात दिसत होता आणि तो अजूनही कायम आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का की प्रत्येक टॅटू ला आणि आणि टॅटू मध्ये कोरलेल्या प्रत्येक डॉट ला एक वेगळं महत्व असतं.

सॅंडी टॅटू स्टुडिओ, कॅलंगुट, गोवा

May be an image of one or more people, tattoo and bird

टॅटू काढणे हा आधी परदेशी फॅड होता  पण आता तो देशी झालाय अस म्हणायला हरकत नाही. मुंबई पुण्यासारख्या असो किंवा ग्रामीण भागातील तरुणाई मध्ये असो टॅटू फॅड हा आपल्याला दिसतोच. काही तरुण तरुणी फक्त कुणाचं तरी अनुकरण करतात तर काही तरुण तरुणीला आपल्या प्रियजनाच्या आठवणीत किंवा इतर काही वयक्तिक कारणासाठी हा टॅटू शरीराच्या हव्या त्या भागावर कोरून घ्यायचा असतो.

मोक्ष टॅटू स्टुडिओ, कॅलंगुट, गोवा

May be an image of one or more people and tattoo

मात्र त्यातच असे काही तरुण तरुणी असतात की त्यांना आपल्या व्यक्तिमत्वात भर पाडण्यासाठी आपले स्टँडर्ड उंचावण्यासाठी हा टॅटू काढायचा असतो. काही जण आपल्या आयुष्यात घडलेल्या वयक्तिक घटनेशी निगडित टॅटू काढतात तर काही जण आपल्या प्रेमीजनांच्या प्रेमापोटी टॅटू काढतात. आपण एकदा का टॅटू काढला तो कायम स्वरूपी शरीरावर राहतो अगदी मरेपर्यंत म्हटलं तरी चालेल. तर काही जण तात्पुरता टॅटू काढतात तर काही जण कायमस्वरूपी टॅटू कोरून घेतात. टॅटू च्या इंचानुसार आपल्याला पैसे मोजावे लागतात.

इंकफिडेल टॅटू स्टुडिओ, असगाव, गोवा

May be an image of one or more people and tattoo

 

संबंधित बातम्या