जीममध्ये जाताय तर, बॉडी मसल्सच्या नादात करू नका या 3 चुका...

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

आजकाल जिममध्ये जाणे हा सुद्धा एक ट्रेंड बनला आहे. फिट दिसण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आठवड्यात तीन ते चार दिवस जिममध्ये घालवतो. विशेषत: शहरातील तरुणांमध्ये जिममध्ये जाण्याचा कल वेगाने वाढला आहे.

आजकाल जिममध्ये जाणे हा सुद्धा एक ट्रेंड बनला आहे. फिट दिसण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आठवड्यात तीन ते चार दिवस जिममध्ये घालवतो. विशेषत: शहरातील तरुणांमध्ये जिममध्ये जाण्याचा कल वेगाने वाढला आहे. मुले आणि मुली सर्व जिममध्ये जातात आणि जीममध्ये जावून घाम गाळणे हे एक महत्त्वाचे काम मानतात. त्यापैकी बरेच तरुण असे आहेत जे कोणत्याही कोच किंवा प्रशिक्षकाशिवाय जिममध्ये कसरत करतात आणि पुन्हा पुन्हा एकच चुका करत जातात. जीममध्ये चुकीच्या मार्गाने वजन उंचलण्याचा थेट त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. बर्‍याच वेळा लोक अशा चुका करतात ज्या त्यांचा जीव देखील घेवू शकतात.  तेव्हा तुम्ही जिममध्ये वजन उंचलतांना चुकूनही अशा 3 चुका करु नका ज्यामुळे तुम्हाला भारी नुकसान सहन करावे लागेल.

होल्डिंग ब्रीथ 

हे खूप कॉमन आहे की जेव्हा आपण वजन उचलतो तेव्हा आपला श्वास थोड्या काळासाठी थांबतो किंवा आपण असे म्हणू शकतो की वजन उचलतांना आपण थोडा वेळ श्वास घेतो पण ही सवय वर्कआउट करतांना तुमच्या जीवावर बेतू शकते. जर तुम्ही पुन्हा पुन्हा जिममध्ये असे केले असेल तर कदाचित तुमचा ब्लड प्रेशर अचानक वाढेल, ज्यामुळे तुम्ही बेशुद्ध होऊ शकता. अशा परिस्थितीत श्वास घेताना श्वासोच्छवासावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा वजन उचलता तेव्हा पहिले श्वास सोडा, नंतर वजन उचलण्याच्या स्थितीत या आणि दीर्घ श्वास घ्या. असे केल्यास आपले ब्लड प्रेशर उत्तम प्रकारे कार्य करातील.

 मसल्स ब्रेक देऊ नका

सहसा जिम इन्स्ट्रक्टर रोज वेगवेगळ्या बॉडी मसल्ससाठी वेगवेगळे व्यायाम करून घेतात, परंतु जेव्हा कधीकधी आपण जिममध्ये एकटे वर्कआउट करतो तेव्हा आपण दररोज सारखाच व्यायाम करतो. जे की, अजिबात करू नये. जेव्हा एखाद्या मसल्ससाठी खास प्रशिक्षण दिले जाते तेव्हा त्याला रिकव्हर होण्यासाठी 48 तास लागतात. अशा परिस्थितीत दोन दिवसांचा ब्रेक घेणे आवश्यक आहे. या दरम्यान आपण बॉडीच्या इतर मसल्‍स च्या  एक्‍सरसाइज करा. पहिल्यांदा छाती नंतर पाठ आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पाय या पध्दतीने तुम्ही वर्कआऊट करू शकता. ही पद्धत स्नायूंना बरे करण्यास मदत करेल. जेणेकरून आपण उत्तम आणि आरोग्यदायी शरीर मिळवू शकाल.

चूकीच्या पोश्‍चर किंवा टेक्निक ने उचलू नका वजन

जर तुम्ही ट्रेनर नसतांना वजन उचलत असाल तर आपण लक्षात ठेवले पाहिजे की, आपण वजन उचलत असतांना ते योग्य पद्धतीने तरउचलत आहात ना?वजन उचलतांना आपला पोश्‍चर तर योग्य आहे ना? तेव्हा हे चांगल होईल की, आपण प्रशिक्षकासमोर प्रशिक्षणघेतले पाहीजे. यासाठी कदाचित आपल्याला जास्त पैसे द्यावे लागतील, परंतु आपल्या योग्य प्रशिक्षणासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. योग्य पोश्‍चर आणि टेक्निकने आपले  मसल्‍स लवकर ग्रो करतील आणि दुखापतीची शक्यताही कमी होईल. 

संबंधित बातम्या