Anxiety Attack: एन्जायटी अटॅक आल्यावर काय कराल ? हे उपाय केल्यावर मिळेल क्षणात आराम

Anxiety Attack
Anxiety AttackDainik Gomantak

एन्जायटी (Anxiety) म्हणजे चिंता! चिंता माणसाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या हेलावून टाकते. यात व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊन तो चिंताग्रस्त व्हायला लागतो. एन्जायटी अटॅक (Anxiety Attack) येतो तेव्हा हे काही उपाय करून तुम्ही या समस्येवर नियंत्रण मिळवू शकता.

भीती, संकट, दबाव (Fear, trouble or Any Kind of Pressure) किंवा कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीमुळे मनात चिंता निर्माण होऊ शकते. चिंता एक सामान्य लक्षण आहे. चिंता एखाद्या गोष्टीची भीती, सतत तणाव, कामावर लक्ष केंद्रित न करणे, चिडचिड वाटणे यांसारख्या कारणांमुळे उत्पन्न होते. यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले आहेत. त्याचा चिंतेवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायदा होऊ शकतो.

Anxiety Attack
नव्या संसद भवनसाठी गोव्यातील माती नवी दिल्लीत पोहोचली

अरोमाथेरपी (Aromatherapy)

अरोमाथेरपी (Aromatherapy) खूप फायदेशीर उपाय आहे. अरोमाथेरपी तेल, मेणबत्ती किंवा परफ्यूमच्या स्वरूपात घेतली जाऊ शकते. यामध्ये लॅव्हेंडर, कॅमोमाइल आणि चंदनाचा समावेश आहे. अरोमाथेरपी मेंदूतील काही रिसेप्टर्स सक्रिय करते, जे चिंताशी लढण्यास मदत करते. असे मानले जाते.

आकडे मोजा (Count Numbers)

जेव्हा जेव्हा तुम्हाला एन्जायटी अटॅक येतो तेव्हा दहापर्यंत मोजा आणि 4 ते 5 वेळा श्वास घ्या आणि बाहेर सोडा. दीर्घ श्वास घेतल्याने हृदयाचे ठोके कमी होतात, ज्यामुळे मानसिक शांतता निर्माण होण्यास मदत होते.

Anxiety Attack
Dabolim: चिमुरडीचा जन्मदात्रीनेच घोटला गळा कारण...

हलका व्यायाम करा (Light Exercisee)

एंडोर्फिन हार्मोन्स रक्ताचे योग्य पंपिंग करण्यास मदत करतात. या हार्मोनच्या वाढीमुळे मूडमध्ये सुधारणा होऊ शकते. तणाव असेल तेव्हा चालणे किंवा पोहणे यासारखे हलके व्यायाम फायदेशीर ठरू शकतात. या दरम्यान, व्यायाम खूप मदत करतो. तथापि, जर तुमची स्थिती अधिक गंभीर असेल किंवा तुम्हाला श्वास घेण्यास अधिक त्रास होत असेल तर ताबडतोब कुणाची तरी मदत घ्या.

मोकळ्या वातावरणात फिरायला जा (Visit Outdoor)

एन्जायटी अटॅकपासून बचावासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे घराबाहेर पडा आणि फिरायला जा. काही काळ मनाऐवजी शरीरावर लक्ष केंद्रित केल्याने चिंतामुक्त होण्यास मदत होते.

एकटेपणा पासून दूर रहा (Stay away from being alone)

एकटेपणा हा एन्जायटी अटॅकचा सर्वात धोकादायक भाग आहे. जेव्हा तुम्हाला एन्जायटी अटॅक येतो तेव्हा एखाद्या मित्राशी किंवा जवळच्या मित्राशी बोला किंवा त्यांना कॉल करा. जर तुम्ही एखाद्यासमोर बसून तुमच्या समस्या सांगितल्या तर तुमचे मन हलके होते आणि तुम्हाला तुमच्या समस्या कमी होताहेत असे वाटू लागते. तुमचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी खूप बोला आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

मंत्र जाप करा (Chant the mantra)

तुम्हाला पॅनिक अटॅक येतो तेव्हा मंत्र जाप करा. यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही शांत होईल. पॅनीक अटॅक दरम्यान, तुमचे लक्ष मंत्र जाप करण्यावर असेल. पॅनीक अटॅक कमी होत नाही तोपर्यंत मंत्राचा उच्चार करत राहा. याकाळात हे फायदेशीर ठरते.

Anxiety Attack
Goa BJP : महेश आमोणकरांच्या भाजप प्रवेशाने खळबळ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com