महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय

महाअष्टमीच्या दिवशी कन्या पूजन केले जाते. या दिवशी दुर्गा देवीची मनोभावे पूजा केल्यास आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.
महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय
Do this remedy please Goddess Durga Dainik Gomantak

शारदीय नवरात्रीच्या (Shardiya Navratri) अष्टमी तिथीला दुर्गा देवीची महागौरीच्या रूपात पूजा केली जाते. महागौरी ही माता पार्वतीचे रूप मानले जाते. या दिवशी दुर्गा देवीची पूजा करतात तसेच मुलींच्या पूजेला विशेष महत्व आहे. महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीची पूजा केल्याने घरातील समस्या दूर होऊन सुख-शांती नांदते. ज्योतिषांच्या मते, या दिवशी विशेष उपाय केल्यास दुर्गा देवी प्रसन्न होते. चला तर मग जाऊन घेवूया कोणते आहेत हे उपाय.

* धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये नऊ मुलींची पूजा करण्याचा नियम आहे. पण किमान तीन मुलींची पूजा करावी. ज्योतिष शास्त्रानुसार महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

* अष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेला लाल रंगाच्या चुनरीत नाणे आणि बताशे अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा होऊन प्रगती होईल.

* अष्टमीच्या दिवशी कन्या पूजेला खास महत्व आहे. या दिवशी 9 मुलींची पूजा केल्यानंतर त्यांना एक भेट वस्तु द्यावी. यामुळे दुर्गा देवी प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास मदत करते.

* घरात सुख- शांती टिकून ठेवण्यासाठी अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ नऊ दिवे लावावे आणि प्रदक्षिणा घालावी. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते.

* ज्योतिष शास्त्रानुसार जर तुमच्या घरात काही अडचणी किंवा समस्या असतील तर पिपळाच्या 11 पानांवर तूप आणि शिंदूरने भगवान रामाचे नाव लिहून माळ बनवावी. हनुमानजींना ही माळ अर्पण करावी. यामुळे घरातील सर्व प्रकारच्या समस्या आणि अडचणी दूर होण्यास मदत मिळते.

* महाअष्टमी व्रताचे महत्व

हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्यात अष्टमी तारीख दुर्गा अष्टमी म्हणून साजरी केली जाते. नवरात्रीच्या अष्टमीला महाष्टमी म्हणतात. यावेळी अष्टमी13 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी दुर्गा देवीची महागौरीच्या रूपात पूजा केली जाते. या दिवशी शस्त्रांच्या स्वरूपात देवीची पूजा केली जाते. म्हणून काही लोक यालाच वीर अष्टमी म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने दुर्गा देवी प्रसन्न होते आणि आपल्या सर्व समस्या दूर करते.

Related Stories

No stories found.