Health tips: 'या' फळाचे गुणकारी उपयोग माहित आहेत का? कोंडा ,पिंपल्स घालवण्यासाठीही आहे रामबाण उपाय

डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात.
Health tips
Health tipsDainik Gomantak

डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात. लाल लुसलुशीत टपोरे डाळिंबाचे दाणे पाहून तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. बऱ्याचदा आपण काय करतो तर डाळिंब सोलून त्यातील दाणे काढून साल फेकून देतो पण तुम्हाला माहित आहे डाळिंबाच्या सालीचे खूप फायदे आहेत जे आजपर्यंत आपल्याला माहितीसुद्धा नसतील. चला तर मग आज जाणून घेऊया.

डाळिंबाच्या साली आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात जितकं डाळिंब पौष्टिक असत तितकंच डाळिंबाची सालसुद्धा हेल्दी असते. बॉडी डिटॉक्स (body detox) करण्यासाठी डाळिंबाच्या सालींचा उपयोग होतो शरीरातील टॉक्सिक म्हणजे विषारी घटक बाहेर काढायचे असतील तर डाळिंबाची साल उत्तम आहे. त्वचेतील केलॉजीनं collagen ब्रेक होऊ नये यासाठी डाळिंबाच्या सालीची पावडर करून करून ती लावावी याने त्वचा अधिक काळ जास्त तरुण आणि तजेलदार राहण्यास मदत होते.

तसेच डाळिंबाचे अजूनही काही फायदे आहेत-

  • अपचन, आम्लपित्त, ताप या कारणांनी जर तोंडास दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्गंधी निघून जाते.

  • शरीर मजबूत, काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे, तयार झालेले सरबत रोज १ कपभर प्यावे.

  • घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्या.

Health tips
Laddoo For Winter : हिवाळ्यात शरीरासाठी फायदेशीर असतात हे लाडू; जाणून घ्या
  • मूळव्याधीमध्ये जर रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घालून द्यावे यामुळे रक्तपडण्याचे बंद होते तसेच अशक्तपणा आला असेल तर डाळिंबाचा रस प्राशन करावा.

  • ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते.

  • डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे, ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अ‍ॅनिमिया आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे.

Health tips
Winter Care: हिवाळ्यात बॉडी डिटॉक्स करण्यासाठी नियमित प्या 'ही' 4 पेये!
  • अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.

  • जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.

  • डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

  • बाराही महिने डाळिंबाचे औषधी गुणधर्म उपयोगात आणण्यासाठी दाडीमावलेह, दाडीमादीघृत इ. डाळिंबापासून बनवलेल्या औषधांचा वापर करावा.

  • हृदय बळकट करण्यासाठी डाळिंबाच्या रसात केशर, लाल गूळ व वेलची घालून त्याचे सरबत करावे व रोज थोडे थोडे प्यावे. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यातील अडथळा दूर होऊन रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com