पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले गोव्यातील तीन तलाव तुम्हाला माहिती आहेत का?   

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 16 मार्च 2021

गोवा हे देशासह जगभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. गोव्यातील काही ठिकाणं ही पर्यटनाच्या बाबतीत रोमांचकारी अनुभव देणारे आहेत. यामध्ये गोव्यातील सुंदर समुद्र किनाऱ्यांसह काही नद्या आणि तलावांचा सुद्धा यात समावेश होतो.

गोवा हे देशासह जगभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. गोव्यातील काही ठिकाणं ही पर्यटनाच्या बाबतीत रोमांचकारी अनुभव देणारे आहेत. यामध्ये गोव्यातील सुंदर समुद्र किनाऱ्यांसह काही नद्या आणि तलावांचा सुद्धा यात समावेश होतो. स्वच्छ आणि निळ्याशार पाण्याने तुडुंब भरलेले तलाव पाहिल्यानंतर त्यात  उडी मारण्याचा मोह अनेक जणांना आवरत नाही. विशेषतः पावसाळ्यात भ्रमंती करण्यासाठी गोव्यातील या तीन तलावांना नक्की भेट द्या. 

1. मायम तलाव 
गोव्याच्या पयर्टनस्थळांपैकी एक असणारा हा तलाव एक उत्तम ठिकाण आहे. मायम तलावाकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्याच्या दोन्हीही बाजूला सुंदर कौलारू छत असणारी घरं आहेत. तलावाच्या चहूबाजुना असलेल्या घनदाट झाडीच्या प्रतिबिंबामुळे तलावातील पाणी सुद्धा हिरव्या रंगाचे असल्याचा भास होतो. तलावात पँडल मारून चालवता येणाऱ्या बाटी आहेत, ज्या बोटींच्या माध्यमातून तलावात फिरता येते. याच परिसरात खाण्याचे पदार्थ विकणारे फेरीवाले असतात. मायम तलावाच्या सौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी पावसाळ्यासारखा सुंदर ऋतू नाही. त्यामुळे गोव्यात गेल्यावर आवर्जून या तलावाला भेट द्या. 

May be an image of lake and tree     

2. कर्तोरीम तलाव 
गोव्यात जाऊन जर फिशिंग करण्याची इच्छा असेल तर कर्तोरीम तलावापेक्षा उत्तम ठिकाण असूच शकत नाही. स्वच्छ पाण्यातील मासे आढळणारे गोव्यातील हे एक प्रमुख ठिकाण आहे. मासे पकडण्याचा छंद असणाऱ्यांना गोव्यातल हे ठिकाण म्हणजे एक उत्तम पर्याय आहे. व्यावसायिक हेतून मासेमारी करण्यासाठी परवानगी आवश्यक असली तरी स्वतःला खाण्यासाठी छंद म्हणून मासे पकडण्यासाठी कुठल्याही परवानगीची आवश्यकता नाही. आणि त्यामुळे मासेमारीसाठी म्हणून तुम्ही या तलावाला भेट देऊ शकता. 

May be an image of twilight, sky, nature, castle and lake
 
3. करंबोलिम तलाव 
पक्षी निरीक्षण करणे किंवा पक्षाचे छायाचित्र काढण्याचा छंद असणाऱ्यांसाठी हा तलाव म्हणजे एक पर्वणीच आहे. गोव्यातल्या सगळ्याच तलावांजवळ पक्षी आढळतील असे नाही, मात्र करंबोलिम तलाव हा अपवाद आहे. हजारो पक्षी आढळणाऱ्या या तलावाजवळ सप्टेंबरच्या सुरुवातील 500 हुन अधिक पक्षी आढळतात. यानंतर फेब्रुवारी महिन्यापर्यंत येथील पक्षांची संख्या 10,000 पर्यंत जाते. पिनटेल बदक, विसल टील्स या पक्षांसाठी हा तलाव माहेरघर आहे.

May be an image of tree, nature, grass and body of water

संबंधित बातम्या