आपल्या रोग प्रतिकारशक्तीचे शत्रू आताच किचनमधून बाहेर काढा

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 10 एप्रिल 2021

आपल्या प्रतिकारशक्ती कमी करणाऱ्या पदार्थाकडे लक्ष दिले नाही. तर आपली रोगप्रतिकारशक्ती आणखी जास्त खालावू शकते.  आपण जाणून घेऊया त्या खाद्यपदार्थाविषयी जे आपली प्रतिकारशक्ती कमी करण्याचे काम करते.

गेल्या एका वर्षात, जगातील सर्वात ट्रेंडी शब्द म्हणजे रोग प्रतिकारशक्ती. होय, कोरोनाच्या काळात जगात गेल्या एक वर्षात रोग प्रतिकारशक्तीचे महत्त्व जास्त वाढले आणि त्याहीपेक्षा ते जास्त समजले. प्रत्येकाने स्वत:ला आणि आपल्य कुटुंबियांना या भयानक विषाणूपासून वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.  परंतु आपण आपल्या प्रतिकारशक्ती कमी करणाऱ्या पदार्थाकडे लक्ष दिले नाही. तर आपली रोगप्रतिकारशक्ती आणखी जास्त खालावू शकते.  आपण जाणून घेऊया त्या खाद्यपदार्थाविषयी जे आपली प्रतिकारशक्ती कमी करण्याचे काम करते.

1.सोडा
आपल्या सर्वांना माहित आहे की सोड्यात हाय कॅलरीशिवाय कोणतेही पौष्टिक मूल्य नसतात. ईट दिस नॉट दॅट नुसार २०११ च्या एका संशोधनात असे आढळले आहे की सोडाच्या सेवनामुळे अनावश्यक वजन वाढते ज्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो. लठ्ठपणामुळे रोगप्रतिकारक शक्तीचे गंभीर नुकसान होते.

2. तळलेले अन्न
जर आपल्याला आपली प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर आपल्या पसंतीच्या फ्रेंच फ्राईज, चिकन फ्राईज, चिकन विग्स इत्यादीपासून दुर रहावे लागेल. आपण जर आताही असे पदार्थ खातअसाल तर आहे हे लक्षात घ्या. 2016 च्या अभ्यासानुसार, उच्च चरबीयुक्त आहारांचा आपल्या प्रतिकारशक्तीवर खूप वाईट परिणाम होतो.

3.अल्कोहोल
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने लोकांच्या रोगप्रतिकार शक्तिवर परिणाम होतो. एवढेच नव्हे तर अल्कोहोलचे सेवन झोपेचे नियोजन पण बिघडू शकते. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. 

4.कॅन्डी केक्स, पेस्ट्री आणि कुकीज

कँडी, चॉकलेट, टॉफी, केक्स, कुकीज यासारखे साखर आणि उच्च चरबीयुक्त पदार्थ आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वेगाने कमी करतात. त्यातील साखरेचे प्रमाण आपल्या शरीरात जळजळ वाढवते ज्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर चुकीचा परिणाम होतो.

5.एनर्जी ड्रिंक्स

बाजारात बर्‍याच प्रकारचे एनर्जी ड्रिंक्स उपलब्ध आहेत जे एनर्जीला सुपर बुस्ट करण्याचा दावा करतात. वास्तविक, ते आपल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यांच्यात भरपूर प्रमाणात कॅफिन असते ज्यामुळे शरीरात जळजळ वाढते. तुम्हाला झोपेचा त्रास होवू शकतो. जी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी खूप महत्वाची आहे.

6.फास्ट फूड

आपल्याला खरोखर आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवायची असेल तर बर्गर, पिझ्झा, सँडविच इत्यादी फास्ट फूड खाणे थांबवा. त्याच्यात भरपूर कॅलरी, संतृप्त चरबी, सोडियम आणि साखर इत्यादी असतात, जे रोग प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी पुरेसे असतात. एवढेच नाही तर त्यांचा वापर केल्याने मधुमेह आणि हृदयरोग होण्याची शक्यताही वाढते.
 

संबंधित बातम्या