आपल्याला आवडणाऱ्या या ड्रिंकमुळेच होऊ शकतात हेल्थ प्रॉब्‍लेम

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

चांगले आरोग्य केवळ आपल्या अन्नावरच अवलंबून नसते तर आपल्या पिण्याच्या सवयींवर देखील अवलंबून असते. आपल्याला असे वाटते की, बर्‍याच समस्या फक्त खाण्यामुळे उद्भवतात.

चांगले आरोग्य केवळ आपल्या अन्नावरच अवलंबून नसते तर आपल्या पिण्याच्या सवयींवर देखील अवलंबून असते. आपल्याला असे वाटते की, बर्‍याच समस्या फक्त खाण्यामुळे उद्भवतात, परंतु असे होत नाही. जर आपण विचार न करता कोणत्याही प्रकारचे पेय पिणे चालू ठेवले तर ते आपल्या शरीरासाठी मोठे नुकसानकारक ठरू शकते. इतकेच नाही तर हे पेय अधिक प्रमाणात घेतल्यास गंभीर आजारही उद्भवू शकतात. आपण आपली तहान भागविण्यासाठी सहज बाजारातून विकत घेतो तेच पेय आपल्यासाठी घातक ठरू शकतात. ते पेय आपण पितो एवढेच नाही तर लहान मुलांना देखील  पिण्यास प्रोत्साहित करतो. तेव्हा आज जाणून घेवूया त्या 3 प्रकारच्या पेयांबद्दल जे आपल्या शरीराला सहज हानी पोहचवित आहेत.

सोडा आणि कोल्ड ड्रिंक्स

कोल्ड्रिंक आणि सोडा आरोग्यासाठी हानिकारक आहेत, हे आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु ते किती हानिकारक आहे हे आपल्याला ठाऊक नाही. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या 2013 च्या मेटा-विश्लेषणानुसार, केवळ 1 ग्लास गोड सोडा किंवा कोल्ड्रिंकमुळे मुले आणि प्रौढांमध्ये बीएमआय आणि वजन वाढण्याची शकता असते. यामुळे दात खराब होतात. नियमित हे पेय प्यायल्यास शरीरात साखरेचे प्रमाण वाढते, वजनही वाढते. पोटाच्या एसिडिटी ची समस्या देखील होते. एवढेच नव्हे तर हृदयरोगाचा आजार असलेल्या पेशंटसाठी हे पेय जास्त हानिकारक ठरू शकते.

स्पोर्ट्स​ आणि एनर्जी ड्रिंक

स्पोर्ट्स आणि एनर्जी ड्रिंक केवळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर नाहीत तर ते खूप हानीकारक देखील आहेत. ‘Obesity' नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, स्पोर्ट्स ड्रिंक्समुळे मुलींमध्ये 0.3 टक्के आणि मुलांमध्ये 0.33 टक्के बीएमआयची वाढ होऊ शकते, तर ‘Depression & Anxiety’ या दुसर्‍या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, या ड्रिंकमुळे ताणतणाव आणि नैराश्यात वाढ झाली आहे.

 चहा-कॉफी

चहा-कॉफी एका मर्यादेपर्यंत पिणे चांगले असू शकते, परंतु जर ते जास्त सेवन केले तर ते देखील खूप हानिकारक आहे.  दूध आणि साखर घातलेला आपल्या चहा शरीराला नुकसान पोहचवू शकतो. (NCBI) एनसीबीआयच्या एका संशोधनात असे आढळले आहे की, जास्त चहा पिण्यामुळे शरीरात लोहाचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे झोपेच्या समस्या वाढू शकते.

संबंधित बातम्या