पालकाचा रस प्यायल्याने त्वचा आणि केस राहतात निरोगी, जाणून घ्या इतर फायदे

हिरव्या पालेभाज्यांचा राजा म्हटल्या जाणार्‍या पालकात भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक असतात.
spinach juice
spinach juiceDainik Gomantak

Benefits of spinach juice: हिरव्या पालेभाज्यांचा राजा म्हटल्या जाणार्‍या पालकात भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक असतात. पालकाचे सेवन अनेक प्रकारे करता येते. क्वचितच असा कोणी असेल ज्याला पालकाच्या फायद्यांबद्दल माहिती नसेल. काळ्या किंवा इतर गडद रंगातही पालक बाजारात उपलब्ध आहे. पालक पचायसाठी अतिशय हलका असतो.

जे लोक आरोग्याबाबत जागरूक असतात ते त्यांच्या आहारात पालकाचा सर्वाधिक समावेश करतात. कच्च्या पालकाच्या रसात जास्त पोषक तत्व असतात. पालक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अमीनो ऍसिडने समृद्ध आहे. पालक केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहे.

spinach juice
Monsoon Health: फिट राहण्यासाठी श्रावणमध्ये या दोन भाज्या खाव्यात

केसांसाठी फायदेशीर -

पालकाचा रस प्यायल्याने केसांशी संबंधित समस्या कमी होऊ लागतात.

पालकाचा रस प्यायल्याने डोक्यात खाज येण्याची समस्या दूर होते.

व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सने समृद्ध पालकाचा रस केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतो.

केसांची चमक कायम ठेवण्यासाठी पालकाचा रस पिणे फायदेशीर ठरू शकते.

आरोग्यासाठी फायदेशीर -

पालकाचा रस प्यायल्याने अॅनिमियाचा धोका कमी होतो.

पालकाचा रस संधिवातापासून आराम देतो.

पालकाचा रस हिरड्यांशी संबंधित सर्व समस्या दूर करतो.

पालकाचा रस रोज प्यायल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो.

spinach juice
Brain Health: अंड्यासह या पदार्थांमुळे स्मरणशक्ती वाढते

जर तुम्हाला चांगले केस आणि चांगल्या आरोग्यासोबत चांगली त्वचा हवी असेल, तर दररोज फक्त एक ग्लास कच्च्या पालकाचा रस सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com