Earth Day 2022: टाइम लॅप्सद्वारा हवामानातील बदलाकडे लक्ष वेधणारं खास गूगल डूडल

पृथ्वी दिनानिमित्त गूगलने एक खास बनवले डूडल
Earth Day 2022
Earth Day 2022Dainik Gomantak

आज जगभरात 22 एप्रिल हा दिवस पृथ्वी दिवस (Earth Day) म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने आज गूगल (Google) कडून देखील खास अंदाजात या दिवसाकडे लक्ष वेधण्यासाठी गूगल डूडल तयार करण्यात आलं आहे. आज होम पेजवर गूगलने टाईम लॅप्सचा वापर करून पृथ्वी दिनाचं खास डूडल तयार केले आहे. आपल्या पृथ्वीवर हवामानातील बदल (Climate Change) कसा परिणाम करत आहे याचं हे चित्रण आहे.

Time Lapes
Time Lapes Dainik Gomantak

गूगल अर्थ द्वारा काही फोटोंच्या मदतीने आज गूगल (Google) डूडलवर टाईम लॅप्स तयार करण्यात आले आहे. काही दशकांमध्ये हवामानातील बदलांमुळे पृथ्वीवरील खडक, हिमनदी आणि सामान्य हिरवळ कशी कमी होत आहे याची दाहकता यामधून मांडण्यात आली आहे.

Earth Day 2022
गोव्यातील 4 स्ट्रीट फूड नक्की चाखून पहा

आजच्या पृथ्वी दिनाच्या निमित्ताने गूगलवर झळकत असलेल्या डूडलवर क्लिक केल्यावर तुमच्या समोर टाईम लॅप्सद्वारा पर्यावरणातील अनेक गोष्टींबाबत माहिती दिसणार आहे. UN ActNow ने पृथ्वी दिन 2022 च्या निमित्ताने हवामान बदलाविरूद्ध अनेक पर्यायांची माहिती दिली आहे. त्यामुळे लोक सकारात्मक बदल करू शकतात. लोकांना पर्यावरण जतन करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com