निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज खा हे ५ ड्राय फ्रूट्स
बर्याचदा आपल्याला फायदे माहिती असूनही कोणते ड्रायफ्रूट्स रोज खावे हे मात्र माहिती नसते. म्हणून आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे.
ड्राय फ्रूट्स (Dry Fruits) खाण्याचे बरेच फायदे आहेत. रोजड्रायफ्रूट्स खाणे शरीरासाठी चांगले असते कारण ते आवश्यक त्या पौष्टिक पदार्थांनी परिपूर्ण असतात. आणि शरिरात त्वरित ऊर्जा निर्माण करतात. हिवाळ्यामध्ये ड्राय फ्रूट्स खाल्याने शरीराला उर्जा मिळते. दिवसभर शरिराला उबदार ठेवण्यास मदत करते. यात ओमेगा-3 फॅटी एसिड, जीवनसत्त्वे आणि खनिजाचे भरपूर प्रमाण असते. परंतु बर्याचदा आपल्याला फायदे माहिती असूनही कोणते ड्रायफ्रूट्स रोज खावे हे मात्र माहिती नसते. म्हणून आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे. दररोज कोणते ड्रायफ्रूट्स खाल्याने आपण निरोगी आणि तंदुरुस्त राहू हे आपण जाणून घेवूया. त्या पाच ड्राय फ्रूट्स बद्दल जाणून घेवूया जे आपल्या आरोग्यास सर्वाधिक फायदेशीर आहेत.
हेझलनट (Hazelnuts)
हेझलनट्स ला पहाडी बदाम देखील म्हणतात, परंतु त्याला अक्रोड समजण्याची चूक करू नका. यामध्ये ते व्हिटॅमिन ई, हेल्दी फैट आणि एंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आहेत. याव्यतिरिक्त, यामध्ये मॅग्नेशियम आणि तांब्या सारख्या आवश्यक खनिजांचा देखील एक चांगला स्त्रोत आहेत. हेझलनट्स नियमित खाल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
अक्रोड (Walnuts)
अक्रोड शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोल नियंत्रित करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास खूप प्रभावी आहे. ते आतड्यात चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढविण्यासाठी आणि मेंदूत ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासाठी देखील अक्रोड खाणे चांगले असते.
काजू (Cashews)
सर्वात जास्त खाल्ल्या जाणार्या ड्रायफ्रूट्सपैकी काजू आहेत. यात ओमेगा -3 फॅटी एसिड व्हिटॅमिन आणि निरोगी चरबीयुक्त पदार्थाचे प्रमाण यात आहे आणि बर्याचदा अनेक गोड पदार्थांची चव वाढविण्यासाठी काजू चा वापर केला जाते.
बदाम (Almonds)
लोक बर्याचदा बदाम रात्रभर भिजवून खातात आणि दुसर्या दिवशी सकाळी खाण्यापूर्वी बदामाचे साल काढतात. आणि नंतर खातात. बदाम खाण्याचे आरोग्यासाठी खूप चांगले फायदे आहेत. कारण यात फायबर, व्हिटॅमिन ई आणि प्रथिने भरपूर प्रमाणात आहेत.
पिस्ता (Pistachios)
पिस्ता खाण्यासाठी स्वादिष्ट आणि चविसाठीही रूचकर आहे. त्याचबरोबर आरोग्यासाठी देखील त्याचे बरेच फायदे आहेत. त्यांचबरोबर यात एंटीऑक्सिडेंटचे भरपूर प्रमाण उपलब्ध असते. आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विविध रोग शरीरापासून दुर ठेवण्यास मदत करते. आणि इम्युनिटी बूस्ट सारखेच हे ड्राय फ्रूट्स आपल्या शरिरासाठी काम करत असते.