तंदुरूस्तीसाठी केळी खात असाल तर आधी हे तोटे जाणून घ्या

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 जून 2021

केळी खाल्यामुळे आरोग्यास अनेक प्रकारेचे फायदे होतात. म्हणूनच बहुतेक लोक आहारात केळीचा समावेश करतात. हे इतर फळांपेक्षा स्वस्त देखील आहे, म्हणून बहुतेक लोक फळांमधून प्रथम केळीची निवड करतात.

केळी खाल्यामुळे आरोग्यास अनेक प्रकारेचे फायदे होतात. म्हणूनच बहुतेक लोक आहारात केळीचा समावेश करतात. हे इतर फळांपेक्षा स्वस्त देखील आहे, म्हणून बहुतेक लोक फळांमधून प्रथम केळीची निवड करतात. परंतु बर्‍याच वेळा असे पाहिले आहे की लोक काम नसतांना दररोज केळी खातात. केळी ख्ल्याने त्यांच्या आरोग्याला त्याचा फायदा होइल असे बरेच जणांना वाटते परंतु काहीवेळा फायद्याऐवजी केळी खाण्याने नुकसान होऊ शकते. जास्त प्रमाणात केळीचे सेवन केल्याने होणाऱ्या नुकसानाविषयी जाणून घेवूया.(Eat bananas to make health but be careful)

वजन वाढू शकते
केळी जास्त खाल्याने वजन वाढण्याची मोठी समस्या उद्भवू शकते. जे लोक वजन कमी करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रयत्न करत राहतात, त्या लोकांनी जास्त केळी खाऊ नये. कारण त्यात कॅलरी जास्त असते आणि त्यामुळे वजन वाढतं. यासह केळी खाल्ल्यानंतर किंवा केळी बरोबर दुध सेवन करणे देखील टाळले पाहिजे.

ब्रेन ट्यूमर झालाय... घाबरु नका जागरुक व्हा!

बद्धकोष्ठता होऊ शकते
जास्त प्रमाणात केळी सेवन केल्यास बद्धकोष्ठता देखील होऊ शकते. कारण त्यामध्ये असलेल्या टॅनिटाईडअॅसिडचा पाचक प्रणालीवर परिणाम होतो. केळी खाल्ल्याने शरीराची हालचाल अलवचिक होते. म्हणून केळीचे मर्यादित प्रमाणात सेवन करा आणि केळी चांगली पिकलेलीच आहे की नाही हे देखील लक्षात ठेवा.

मज्जातंतूंचे विकार होण्याचा धोका 
केळी जास्त प्रमाणात खाल्यामुळे  नर्व्स डैमेज होवू शकतात, आपल्या शरीराचे संतुलन बिघडण्याची शक्यता असते. विशेषत: ज्या लोकांकडून वर्कआऊट होत नाही त्यांना केळी खाल्याने जास्त त्रास होण्याची शक्याता आहे. केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6 असते. म्हणून जे लोक व्यायाम करीत नाहीत त्यांनी जास्त केळी खाऊ नये.

Flowers Medicine: फुलाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थ

ओटीपोटात गॅस आणि वेदना होवू शकतात
जास्त केळी खाल्ल्याने पोटदुखीची समस्या उद्भवू शकते. केळीमध्ये स्टार्च असते, त्यामुळे पचण्यास वेळ लागतो. यामुळे पोटात दुखण्याबरोबरच मळमळ आणि उलट्यांचा त्रास देखील होऊ शकतो. केळीमध्ये फ्रुक्टोज असते, म्हणून जास्त केळी खाल्ल्याने पोटात गॅस देखील होतो.

मायग्रेनचा त्रास वाढू शकतो
डोकेदुखीचा त्रास असलेल्यांनी जास्त केळी खाऊ नये. केळीमध्ये टायरामाइन नावाचा पदार्थ असतो जो मायग्रेन वाढविण्यास मदत करू शकतो.

शुगर लेवल वाढू शकते
जास्त केळी खाल्याने शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. केळीमध्ये नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे शुगर लेवल वाढण्याची समस्या उद्भवू शकते. मधुमेह असलेल्या लोकांनी केळी खाणे टाळावे.

संबंधित बातम्या