मासिक पाळीत सकस आहार घ्या, वेदनेपासून सुटका मिळवा

Eat a healthy diet during menstruation
Eat a healthy diet during menstruation

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया आहे. दर महिन्याला येणारी मासिक पाळी काही स्त्रिया करीत वेदनारहित असते तर काही  स्त्रियाकरीता खूप वेदनादायी असते. पाळी दरम्यान स्त्रियांचे पोट, पाठ, आणि पाय खूप दुखतात.काहींना मूड स्विंग, चक्कर, लूज मोशन  असे अनेक त्रास होतात. हे सगळे बदल (menstruation)मासिक पाळीमुळेच होतात. कालावधीत स्त्रियांनी खाण्याकडे लक्ष देणं गरजेचं असते. परंतु या काळात काय खावे आणि काय नाही याची  माहिती नसल्याने विपरीत परिणाम होऊ शकतात. म्हणून मासिक पाळीत कोणता आहार घ्यावा जाणून घेऊया. (Eat a healthy diet during menstruation)

मासिक पाळीत स्त्रियांनी आहाराकडे लक्ष देणें आवश्यक आहे. त्यावरच आपली दिवसभराची दिनचर्या अवलंबून असते. आहारामध्ये पोषकतत्वचा (vitamin)समावेश केल्यास प्रकृती चांगली राहते. तसेच अशक्तपणा कमी होतो. आहारात भाकरी, फुलका, मुगडाळ, आणि फळभाज्या यांचा समावेश करावा. तसेच मध,साखर आणि गूळ हे गोड पदार्थ खावेत. गाईचे दूध , तूप आणि ताक  यांचा देखील आहारात समावेश करावा. मासिक पाळीत योग्य आहार घेतल्यास शरीरातील पचन क्रिया चांगली राहते. त्यामुळे या काळात त्रास होत नाही.

स्त्रियांनी फायबरयुक्त असा आहार घेतला पाहिजे. त्यामुळेच दिवसभर ऊर्जा मिळते. अनेकांना गॅसचा त्रास होतो, परंतु या काळात योग्य तो आहार घेतल्यास गॅसचा त्रास होत नाही. पचनक्रिया चांगली राहते. ओटस, पोहे,मूग डाळीची खिचडी, मूग मसुराची डाळ आणि चपाती यांचा देखील आहारात समावेश असणे गरजेचे आहे. या सर्व पदार्थांचे पाचन सहज होते. 

मासिक पाळीत स्त्रियांनी ' बी ' जीवनसत्वयुक्त पदार्थांचे सेवन करावे. रात्री खजूर भिजवत ठेऊन सकाळी नियमित खाल्याने पाळीत होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळू शकते. मखाना तुम्हाला माहिती असेल, ते तुम्ही पाहिजे तसे खाऊ शकता.यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. लोह शरीरातील ऑक्सिजनची पातळी (Oxygen level) वाढवण्यास मदत करते यामुळे वेदना कमी होतात. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com