दिवसातून एक ते दोन केळी खा अन् बद्धकोष्ठता दूर करा

दररोज फक्त 1 केळी खाल्ल्याने होतात अनेक फायदे
Banana Benefits | How to get rid from constipation
Banana Benefits | How to get rid from constipationDainik Gomantak

केळी एक असे फळ आहे, जे शरीर स्वास्थ बनवण्यासाठी परफेक्ट फळ मानले. ज्यांना अॅथलीट व्हायचे आहे किंवा जे लोकं खूप पातळ आहेत आणि त्यांना शरीर वाढवायचे आहे, त्यांना केळी खाण्याचा अधिक सल्ला दिला जातो. म्हणूनच असे मानले जाते की केळी वजन वाढविण्यात आणि स्नायू बनविण्यात मदत करते. केळीमुळे तुमच्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो, आता ते फायदे कोणकोणते आहे ते आपण जाणून घेवूया... (How to get rid from Constipation)

1. शरीराचे तापमान नियंत्रित करते

केळी हे असेच एक फळ आहे, जे जवळपास वर्षभर उपलब्ध असते. हे उन्हाळा आणि हिवाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यात उन्हापासून बचाव करण्यासाठी तुम्ही दररोज एक किंवा दोन केळीही खाऊ शकता. शरीरात जास्त आणि जास्त काळ पाणी टिकवून ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे.

Banana Benefits | How to get rid from constipation
केळी वजन कमी करण्यास मदत करते?

2. छातीत जळजळ पासून आराम

छातीत जळजळ होण्याची समस्या दूर करण्यासाठी केळी खूप फायदेशीर आहे. जेव्हाही छातीत जळजळ, पोटात आम्लपित्ताचा त्रास होत असेल तेव्हा केळी खावी. केळी अँटासिड्सला नैसर्गिक पर्याय म्हणून काम करते.

3. तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त

ज्या लोकांना मानसिक थकवा आणि तणाव जास्त जाणवतो, त्यांनी रोजच्या आहारात केळीचा समावेश केला पाहिजे. केळी रक्तदाब योग्य ठेवण्यास मदत करते, पचनक्रिया योग्य करते. केळ्यामध्ये ट्रिप्टोफान हा पदार्थ असतो जो तुमच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करतो.

4. लूज मोशनवर योग्य उपाय

जेव्हा तुम्हाला लूज मोशनच्या समस्येचा सामना करावा लागतो, तेव्हा तुम्ही केळी खाऊन तुमचे पोट बरे करू शकता. होय, लूज मोशन बरा करण्यासाठी केळी खूप महत्त्वाची आहे. मात्र, जर तुम्हाला लूज मोशन सोबतच पोटदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही केळी खाणे टाळावे आणि दुखणे बरे झाल्यानंतर तुम्ही केळी खाऊ शकता. जेणेकरून शरीरात आलेली कमजोरी कमी होती.आणि लूज मोशन नियंत्रित होईल.

Banana Benefits | How to get rid from constipation
National Banana Day 2022: केळीपासून बनवा 5 आरोग्यदायी पदार्थ

5. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयुक्त

एकीकडे, केळी खाल्ल्याने लूज मोशन दूर होते, तर दुसरीकडे केळी खाल्याने बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. केळीमध्ये भरपूर फायबर असते आणि ते आतड्यांमध्ये एक वंगण म्हणूनही काम करते. त्यामुळे पोट साफ होण्यास सोपे जाते आणि बद्धकोष्ठता दूर होते. बद्धकोष्ठता असल्यास, दिवसातून एक किंवा दोन केळी खाऊ नका.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com