रक्तातलं साखरेचं प्रमाण कंट्रोल करायचंय? कांदा करेल मदत

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

णेकरून आपल्या रक्तातील ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहू शकेल. रक्तातील ब्लड शुगर लेवल नियंत्रणात ठेवण्याचा एक विशेष उपाय म्हणजे कच्चा लाल कांदा खाणे.

शरीरात शगर लेवल वाढणे किंवा कमी करणे, या दोन्ही समस्या मधुमेहाच्या कॅटेगरी मधल्या आहेत. या दोन्ही समस्या मेटाबोलिक डिसऑर्डरमुळे उद्भवतात. यामध्ये, रक्तातील साखरेची पातळी एकतर सामान्य लेवल पेक्षा जास्त किंवा कमी आहे. सध्या जगभरात सुमारे 425 दशलक्ष लोक या समस्येतून जात आहेत. मधुमेहामुळे शरीरात इतरही अनेक आजार उद्भवतात. म्हणून, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्या रक्तातील ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहू शकेल. रक्तातील ब्लड शुगर लेवल नियंत्रणात ठेवण्याचा एक विशेष उपाय म्हणजे कच्चा लाल कांदा खाणे.

अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की कांद्यामध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट्स रक्तातील ग्लुकोज नियंत्रित करण्यास मदत करतात. 100 ग्रॅम लाल कांदा केवळ 4 तासात रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतो. लाल कांद्याबरोबरच तुम्ही हिरव्या कांद्यालाही आपल्या आहारात स्थान समाविष्ट करू शकता. कांद्याचे सेवन कसे करावे हे आपण जाणून घेवूया जेणेकरुन आपल्या रक्तातील ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहू शकेल.

या कारणांमुळे होतो भरपूर फायदा
कांद्यात भरपूर प्रमाणात फोलेट्स, सोडियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ए, सी, ई भरपूर प्रमाणात आढळतात. यामध्ये फायबरची मात्रा उत्तम असते जे अन्न पचन करण्यास मदत करते. मात्र या तुलनेत कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप कमी असते, जे रक्तातील ग्लूकोजची पातळी कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे रक्तातील ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते.

ऑफिसच्या कामाचा खूप स्ट्रेस येतोय? मग या गोष्टी लक्षात ठेवाच 

अशा प्रकारे कांद्याचे सेवन करू शकता

  • आपण सॅंडविचच्या माध्यमातून कच्चा कांदा खाऊ शकता 
  • सलादमध्ये आपण कच्चा लाल कांदा खावू शकता.
  • लाल कांद्याला किसून पाण्यात मिसळा, त्यात लिंबू आणि मीठ मिसळून ते तुम्ही खावू शकता.
  • कांद्याचे सूप बनवून तुम्ही ते पीऊ किंवा खाऊ शकता.
  • याव्यतिरिक्त आपण भाज्यांमधून देखील कांदा खाऊ शकता.
  • त्याचप्रमाणे कोशिंबीर म्हणून आणि भाज्यामध्ये हिरव्या कांद्यांचा वापर करू शकता.

संबंधित बातम्या