गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळाची ‘करो संभव’ संस्थेला मान्यता

Electronic waste: आपला ई-कचरा योग्य हाती सोपवा
Electronic waste| Goa
Electronic waste| GoaDainik Gomantak

'करो संभव’ या संस्थेने 24 जून रोजी म्हापसा शहरात आपल्या ‘मोबाईल ई- वेस्ट क्लेक्शन’ मोहिमेतून 471 किलो इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा केला. त्या दिवशी पाऊस जोरदार कोसळत होता तरी देखील आपल्याकडे साचलेला इलेक्ट्रानिक कचरा घेऊन नागरिक व्हॅनपर्यंत आले होते. या कचऱ्याचा छोटासा मोबदला म्हणून काही रक्कमही त्यांना मिळाली.

‘करो संभव’ ही संस्था इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठी काम करते. इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्यांची ही देखील जबाबदारी असते की अशा उत्पादनामुळे निर्माण झालेल्या कचऱ्यावर मर्यादा यावी. या कंपन्यांकडून हा ई-कचरा गोळा करण्यासाठी निधी पुरवला जातो. ज्या निधीतून ‘करो संभव’ संस्था काम करते. असा कचरा गोळा करणारी ‘करो संभव’ ही देशातील आघाडीची संस्था आहे. ॲपल, डेल, एरिक्सन, नोकीय, टाटा एनर्जी, स्नायडर, हॅवेट- पॅकार्ड यासारख्या कंपन्याबरोबर मिळून ही संस्था काम करते. गोव्याच्या (Goa) राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाची या संस्थेला मान्यता आहे.

बराच काळ अशी परिस्थिती होती की एखाद्या कंपनीने उत्पादन बनवले की ग्राहक ते वापरायचा आणि काही वर्षानंतर ते निरुपयोगी बनले की कचऱ्यात फेकून द्यायचा. कचरा गोळा करणारे अशातऱ्हेचा कचरा स्क्रॅपवाल्यांकडे नेऊन विकायचे. स्क्रॅपवाला त्या वस्तूंचे आपल्या परीने विघटन करायचे. मात्र हे धोकादायक असायचे. इलेक्ट्रॉनिक वस्तूत असलेली रसायने हाताळणे हे खुपच जबाबदारीचे काम असते. त्यातले अपायकारक धातू आणि रसायने वातावरणही प्रदुषित करू शकतात. त्यामुळे ई-कचरा (Electronic waste) स्क्रॅपवाल्यांकडे जाणे हे जोखमीचे होते. आता ‘करो संभव’ अशाप्रकारचा ई-कचरा गोळा करून तो अधिकृत ‘रिसायकल केंद्रावर पोहचवण्याची जबाबदारी घेते.

2017 साली हे काम सुरू केलेल्या ‘करो संभव’ ने आतापर्यंत देशभरातून सुमारे 21,000 मेट्रीक टन ई -कचरा गोळा केला आहे. देशभरातली 800 इलेक्ट्रानिक वस्तू दुरुस्त करणारी ठिकाणे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या मोठ्या ग्राहक असलेल्या 500 कंपन्या, 5000 कचरा गोळा करणारे कामगार आणि 1500 शाळांशी ‘करो संभव’ जोडली गेली आहे. सरकारी कार्यालये, उद्योग, शाळा-कॉलेज, बॅंक, हॉस्पिटल अशा मोठ्या प्रमाणात ई-कचरा निर्माण करणाऱ्या जागांमधून कचरा गोळा केला जात असतो.

‘करो संभव’ च्या पणजी येथील जागेत लोक येऊन त्यांचा ई-कचरा देतात. गोव्यात या संस्थेचे काम 2018 मध्ये सुरू झाले आणि आतापर्यंत ‘करो संभव’ ने 1 लाख किलोपेक्षा ई-कचरा या राज्यातून गोळा करून रिसायकल केंद्रावर पाठवला आहे. ही संस्था कचरा गोळा करण्याबरोबरच अशा कचऱ्यासंबंधी नागरिकांत जागरुकता निर्माण करण्यासाठी विशेष सत्रेही आयोजित करते. गोव्यात (Goa) निरनिराळ्या ठिकाणी आतापर्यंत त्यांनी 100 पेक्षा अधिक जागरुकता कार्यशाळा घेतल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तुंमध्ये असणारे मर्क्युरी, क्रोमियम, कॅडियम, लीड (शिसे) हे घटक जर मोकळे झाले तर माणसांच्या फुफ्फुसांना, मेंदूला, मूत्रपिंडाना आणि प्रजोत्पादन प्रणालीला अपाय करू शकतात, बालकांच्या वाढीला अवरोध निर्माण करू शकतात.

‘करो संभव’ गोव्यात 2018 पासून जरी काम करत असली तरी त्यांची ‘मोबाईल व्हॅन’ (Mobile vine) सेवा 2021 मध्ये सुरू झाली. गोव्यातल्या वेगवेगळ्या शहरातून आणि गावांमधून या व्हॅनने आतापर्यंत 74 97 किलो वजनाचा इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com