Eye Makeup Tips: आयलायनर रिमूव करण्याच्या सोप्या पद्धती

Eye Liner Removal Tips: आयलायनर काढण्यासाठी खोबरेल तेल देखील वापरू शकता.
Eye Makeup Tips
Eye Makeup TipsDainik Gomantak

सुंदर डोळे चेहऱ्याचे सौंदर्य अनेक पटींनी वाढवतात असे मानले जाते. स्त्रिया डोळ्यांना आकर्षक बनवण्यासाठी आय लायनरचा वापर करतात. ऑफिस असो किंवा कोणतेही फंक्शन, असो महिलांना कुठेही आयलायनर लावून जायला आवडते. आयलायनरने डोळे सुंदर आणि मोठे दिसतात. परंतु, अनेक तज्ञांचे मत आहे की डोळ्यांवर आयलायनर किंवा कोणत्याही प्रकारचा मेकअप लावून झोपू नये. यामुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. (eyeliner makeup tips news)

रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांचावर मेकअप काढून झोपावे. आयलायनर काढण्यासाठी बहुतेक स्त्रिया पाण्याने डोळे धुतात. पण, पाण्याचा वापर करूनही ते लवकर निघत नाही. चला तर मग जाणून घेऊया आयलायनर काढण्याच्या टिप्स

* गुलाब जलचा वापर
त्वचा चमकदार बनवण्यासाठी गुलाब जलचा वापर केला जातो. पण, तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही गुलाब जलने (Rose Water) आयलायनर सहज काढू शकता. आयलायनर काढण्यासाठी, प्रथम तुम्ही दोन लहान कापसाचे गोळे घ्या आणि ते दोन्ही गुलाब जलने भिजवा. यानंतर, हलक्या हातांनी आयलायनरवर लावा आणि 2 मिनिटानी पुसून काढावे.

* खोबरेल तेल
खोबरेल तेल आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. या तेलाचा वापर तुम्ही आयलायनर काढण्यासाठी करू शकता. आयलायनर काढण्यासोबतच खोबरेल तेल तुमच्या डोळ्यांना पोषण देते. त्यामुळे काळी वर्तुळे देखील कमी होतात. डोळ्यांवरील आयलायनर काढण्यासाठी टिश्यू पेपर घ्या आणि त्यात नारळाचे दोन ते तीन थेंब टाकून डोळे स्वच्छ करा. दोन मिनिटांत तुमचे डोळे स्वच्छ होतील.

Eye Makeup Tips
Health Tips : भेंडीमुळे कमी होते शुगर लेवल, जाणून घ्या आरोग्यासाठी भेंडीचे इतर फायदे

* होममेड मेकअप रिमूवर
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरी मेकअप रिमूव्हर देखील बनवू शकता. होममेड मेकअप रिमूव्हर बनवण्यासाठी तुम्ही एक चमचा कच्चे दूध घ्या. त्यात बदामाचे तेल घाला. यानंतर, कापसाच्या मदतीने ते डोळ्यांवर लावून स्वच्छ करा. आयलायनर दोन मिनिटांत स्वच्छ होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com