चेहरा टॅन झालाय? मग हे' घरगुती उपाय ट्राय कराच

Untitled design - 2021-05-09T190320.188.jpg
Untitled design - 2021-05-09T190320.188.jpg

उन्हाळ्यात त्वचेवर टॅनिंग होणे सामान्य आहे. मात्र टॅन झालेली ही त्वचा पुन्हा तजेलदार करण्यासाठी प्रयत्न करताना अनेक अडचणी येतात. अशा वेळी चेहऱ्याची, हाताची आणि पायांची त्वचा रंगविरहीत दिसू लागते. सामान्यत:  प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्वचा काळवंडते, तर प्रदुषणामुळे  धूळ जमा झाल्यास त्वचा रंगविरहीत दिसू लागते. अशावेळी आपण विचार करतो की ही त्वाचेही सामान्य सामान्य आहे पण, सूर्याच्या अतिनील किरणांपासून रक्षण करण्यासाठी आपले शरीर काळवंडू लागते.  (Face tanned? Then try this 'home remedy' ) 

मानवाच्या त्वचेमध्ये  मेलानिन नावाचे एक केमिकल सूर्याच्या अतिनील किरणोत्सर्गापासून बचाव करण्यासाठी  त्वचेच्या पृष्ठभागावर केमिकल जमा होते ज्यामुळे त्वचा काळी पडते. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही सुर्प्रकाशात राहाल तोपर्यंत तुमची त्वचा अधिकच गडद होणार. अशावेळी आपण सनस्कीन लावल्यास काही वेळासाठी त्वचेचा बचाव होऊ शकतो. पण जर तुमच्या त्वचेवर टॅनिंग आली असेल तर ती काढून टाकण्यासाठी आपण काही घरगुती उपचारांची मदत घेऊ शकता, जे टॅनिंग दूर करण्यात प्रभावी आहे.

1. कोरफड पॅक
कोरफडमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे सनबर्न बरा करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, कोरफड मेलेनिनचे परिणाम कमी करते, त्वचेवरील गडदपणा कमी करते, ज्यामुळे टॅनिंग हळूहळू कमी होऊ लागते. 

2.  हळदीचा वापर
एका संशोधनानुसार, उन्हामुळे त्वाचेही होणारी हानी सुधारण्यास हळद खूप प्रभावी आहे. हे त्वचेला हायड्रेट करते आणि त्वचेसाठी  नैसर्गिक संरक्षणात्मक तेल सोडते. टॅनिंग बरा करण्यासाठीही हळद खूप फायदेशीर आहे. जर हे हरभरा पीठ मिसळून चेहऱ्यावर लावले तर त्याचा बराच फायदा होतो.  

3.  टोमॅटो पॅक
टॅनिंग काढण्यासाठी टोमॅटोचा वापर देखील केला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही टोमॅटो मॅश करून घ्या आणि ही पेस्ट चेहऱ्यावर चांगली लावा. 15 मिनिटांनी चेहरा ताज्या पाण्याने धुवा. आपण आठवड्यातून 3 वेळा ही प्रक्रिया करा. आपली त्वचा पुन्हा चमकदार दिसू लागेल. 

4. हरभरा पीठ पॅक
तीन चमचे हरभऱ्याच्या पिठात एक चमचा ऑलिव्ह तेल घाला. आता त्यात एक चिमूटभर हळद घालून पेस्ट बनवा. ते 15 मिनिटांसाठी चेहर्‍यावर लावा आणि ते कोरडे झाल्यानंतर ताज्या पाण्याने धुवा. आठवड्यातून 3 वेळा असे केल्यास आपल्याला फरक नक्कीच दिसून येईल. 

5. दूध आणि केशर
चार चमचे दुधात एक चिमूटभर केशर घाला. 30 मिनिटांसाठी तसेच सोडा. यानंतर कापसाच्या साहाय्याने तुमच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर या दुधाचे मिश्रण लावा. एक तास हे मिश्रण चेहऱ्यावर असेच राहूद्या आणि नंतर पाण्याने धुवा.

6. चंदन पॅक
चार चमचे चंदन पावडरमध्ये 10 चमचे गुलाब पाणी घालून पेस्ट बनवा. यानंतर, 20 मिनिटांसाठी ते चेहऱ्यावर लावा आणि थंड पाण्याने धुवा. यामुळे सूर्यप्रकाशामुळे काळवंडलेल्या त्वचेला आराम मिळेल आणि त्वचा हळूहळू चमकू लागेल. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com