Father’s Day 2022 Google Doodle: गुगलने डूडलद्वारे दिल्या ‘फादर्स डे’ च्या खास शुभेच्छा!

Father’s Day 2022 Google Doodle News: आपल्या वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त करायचा दिवस म्हणजे ‘‘फादर्स डे’
Father’s Day 2022 Google Doodle: गुगलने डूडलद्वारे दिल्या ‘फादर्स डे’ च्या खास शुभेच्छा!
Father’s Day 2022 Google DoodleDainik Gomantak

आज सर्वत्र ‘फादर्स डे’ (Father’s Day 2022) साजरा केला जात आहे. आपले ‘बाबा’ म्हणजे आपल्या घराचा कणा. आपल्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती बाबांना ते किती महत्त्वाचे आहे, हे व्यक्त करण्यासाठीचा एक खास दिवस म्हणजे ‘फादर्स डे’. आपले एखाद्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी विशिष्ट दिवसाची गरज नसते. पण खास दिवशी खास पद्धतीने शुभेच्छा देऊन हा दिवस आणखी स्पेशल बनवला जातो. याच खास दिवसाला आणखी खास बनवण्यासाठी गुगलने देखील एक विशेष डूडल तयार केले आहे. (Father’s Day 2022 Google Doodle News)

या खास गुगल डूडलद्वारे त्यांनी सर्व वापरकर्त्यांना ‘फादर्स डे’ च्या शुभेच्छा दिल्या आहे. सर्च इंजिन गुगलने आज 19 जून 2022 रोजी ‘फादर्स डे’चे निमित्त हे खास डूडल बनवले आहे. समस्त वडिलांना समर्पित असलेल्या ‘फादर्स डे’ च्या या डूडलमध्ये एका लहान मुलाचा हात आणि त्याच्या वडिलांचा हात दिसत आहे. हे दोघे मिळून छानसं चित्र तयार करत आहेत.

Father’s Day 2022 Google Doodle
Father's Day 2022: 'फादर्स डे' का केला जातो साजरा, जाणून घेउया 'या' खास दिवसाचे महत्त्व
Father’s Day 2022 Google Doodle
Father’s Day 2022 Google DoodleDainik Gomantak

* फादर्स डे 2022 चा इतिहास आणि महत्त्व

सर्वात आधी फादर्स डे 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता. वॉशिंग्टनच्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड ने आपल्या वडीलांच्या आठवणींत या दिवसाची सुरुवात केली होती. सोनोराची आई फार लवकर मरण पावली. त्यानंतर सोनोराने तिच्या वडिलांसोबत लहान भावंडांना वाढवले. सोनोराला वाटले की नवीन मान्यताप्राप्त मदर्स डे बद्दल चर्चचा प्रवचन ऐकताना वडिलांना ओळखीची गरज आहे. तिच्या वडिलांबद्दल अत्यंत प्रेम आणि आदर दाखवून, तिने स्पोकेन मंत्रिमंडळाशी संपर्क साधला आणि त्यांना तिच्या वडिलांचा वाढदिवस, 5 जून हा फादर्स डे म्हणून ओळखण्यास सांगितले. मात्र, त्यांनी हा दिवस महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ठेवण्याचा निर्णय घेतला.

वर्षानुवर्षे, 'फादर्स डे' लोकप्रिय झाला आणि देशभरात साजरा केला गेला. त्यावेळचे अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी 1966 मध्ये अधिकृतपणे जूनचा तिसरा रविवार 'फादर्स डे' म्हणून घोषित करण्यासाठी राष्ट्रपती पदाच्या घोषणेवर स्वाक्षरी केली. त्यानुसार, 19 जून हा 'फादर्स डे' म्हणून साजरा केला जाऊ लागला.

जगाच्या अनेक भागांत 'फादर्स डे' ला सुट्टी दिली जाते. पण भारतात हा दिवस तितक्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जात नाही. पण या दिवशी आपल्या वडिलांना भेटवस्तू देऊन त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त केले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com