Father's Day का साजरा करतात माहिती आहे का ?

दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो.
Father's Day का साजरा करतात माहिती आहे का ?
Father's Day Dainik Gomantak

बाप हा एक असा शब्द आहे ज्याचे वर्णन करणे फार कठीण आहे. आपल्या आयुष्यात वडिलांचे स्थान खूप खास आहे. आपण स्वतः संकटात असलो तरीही घराचा तो मजबूत खांबच आपल्याला सुरक्षित ठेवतो आणि प्रत्येक संकटापासून वाचवतो.

Father's Day
शारीरिक संतुलन आणि एकाग्रता वाढवण्यासाठी योगासन ठरते फायदेशीर

वडिलांना विशेष वाटावे यासाठी दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. या खास प्रसंगी, गुगल डूडलमध्ये फादर्स डेचे चित्र दिसत आहे, पण या दिवसाची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगू. फादर्स डे 19 जून 1910 रोजी सुरू झाला होता, असे मानले जाते की वॉशिंग्टनच्या स्पोकेन शहरात राहणारी मुलगी होती, तिचे नाव सोनोरा डॉड होते. फादर्स डेची सुरुवात त्यांनीच केली होती. खरे तर सोनेरा खूपच लहान होती. तिची आई गेल्यावर सोनेराचे पालनपोषण तिच्या वडिलांनी केले. आई ज्या जबाबदाऱ्या पार पाडते त्या सर्व वडिलांनी पार पाडल्या.

Father's Day
शारीरिक संतुलन आणि एकाग्रता वाढवण्यासाठी योगासन ठरते फायदेशीर

यानंतरच सोनाराला वाटले की आपल्या वडिलांना खास वाटण्यासाठी फादर्स डे का साजरा करू नये. याबाबत सोनारा यांनी याचिका दाखल केली आणि ती याचिकाही मान्य करण्यात आली. त्यानंतर 19 जून 1910 मध्ये पहिल्यांदा फादर्स डे साजरा करण्यात आला. आता प्रत्येकजण आपल्या वडिलांना आदर देण्यासाठी आणि त्यांच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास पद्धतीने साजरा करतात. फादर्स डेच्या या खास प्रसंगी गुगलने डूडलद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com