Feng Shui Tips: फेंग शुई ड्रॅगन वाढवेल आत्मविश्वास

Feng Shui Vastu Tips: फेंगशुईनुसार ड्रॅगन हा एक दैवी प्राणी आहे, जो भाग्याचे प्रतीक मानला जातो.
Feng Shui Vastu Tips
Feng Shui Vastu TipsDainik Gomantak

फेंगशुई शास्त्रामध्ये, जीवनात यश मिळविण्यासाठी धन आणि उत्तम आरोग्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. अशी अनेक चिन्हे आहेत, जी आपल्या घरात ठेवल्याने आपल्या घराची सुख-शांती आणि समृद्धी वाढेल. यासोबतच तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहिल. फेंगशुई हे चीनचे वास्तुशास्त्र आहे. अंधश्रद्धा आणि श्रद्धांमुळे त्यांचा विस्तार भारतातही वेगाने होत आहे. सुख, शांती आणि समृद्धीसाठी लोक आपल्या घरात चीनची प्रतीके ठेवतात. (Feng Shui Tips for Money)

* घरामध्ये (Home) संपत्ती आणि समृद्धी आणण्यासाठी, ड्रॅगनचा चेहरा घराकडे असणे आवश्यक आहे. चांगल्या आणि सकारात्मक परिणामासाठी ड्रॅगनला खुल्या जागी ठेवणे फार महत्वाचे आहे.

* ड्रॅगनला (Dragon) बंद खोलीत ठेवू नये. त्याचा चेहरा भिंतीकडे नसावा. ड्रॅगन खिडक्या आणि दरवाजाच्या दिशेने ठेउ नये. ड्रॅगनच्या पंजामध्ये मोती ठेवल्याने धनहानी होउ शकते.

* तुमच्या ऑफिसमध्ये ड्रॅगन पूर्व दिशेला ठेवावा. ड्रॅगन टेबलवर ठेवता येतो. त्यामुळे बिझनेसमध्ये यश मिळु शकते.

Feng Shui Vastu Tips
Raw Vegetables: मशरूमसह 'या' 3 भाज्या चुकूनही खाऊ नका कच्च्या

* बेडरुममध्ये ड्रॅगन कधीही ठेवू नये. कारण त्यातून निर्माण होणारी ऊर्जा शरीराला घातक ठरू शकते.

* घरात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यासाठी (Health) घराच्या पूर्व दिशेला हिरवा ड्रॅगन ठेवावा. त्यामुळे लोकांचे आरोग्य चांगले राहते.

* घर धनाने भरलेले ठेवण्यासाठी सोनेरी रंगाचा ड्रॅगन ठेवावा. आर्थिक लाभासाठी हे शुभ मानले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com