Monsoon Infection पासून दूर राहण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
Monsoon Infection Dainik Gomantak

Monsoon Infection पासून दूर राहण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

पावसाळ्याच्या दिवसांत शरीराची रोगप्रतिकारकशक्ती (Immunity) कमी होण्याची शक्यता असते

पावसाळ्याच्या दिवसांत (Rainy Day) आरोग्याची (Health) आणि त्वचेची (Skin) काळजी घेणे गरजेचे आहे. या दिवसांत शरीराची रोगप्रतिकारकशक्ती (Immunity) कमी होण्याची शक्यता असते. शिवाय वातावरणातील आर्द्रतेमुळे जिवाणू आणि संसर्गजन्य आजार वाढू शकतात. यामुळे आपल्या आरोग्याची (Health) काळजी घेणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय उपाय करावे.

* डासांपासून बचाव

पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यु, मलेरिया यासारखे आजार डोकेवर काढतात. यामुळे आशा दिवसात बाहेर जाताना पूर्ण बाहीचे कपडे घालावे. घराच्या आजूबाजूच्या परिसरात किंवा घरात जर पाणी साठलेले असेल तर ते काढून टाकावे. जसे की, कुलर, टाक्यामध्ये पाणी साचू शकते. यामुळे डासांची उत्पत्ती होऊन अनेक आजार पसरू शकते. यामुळे स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.

* खाण्या-पिण्याची काळजी

पावसाळ्याच्या दिवसांत आरोग्य निरोगी राहण्यासाठी बाहेरचे आणि उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे. उघड्या पदार्थांनावर डास, धूळ बसते. यामुळे पोटासंबंधित अनेक आजार होऊ शकतात. यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत घरात शिजवलेले अन्नच खावे. यामुळे आरोग्य चांगले राहून अनेक आजारांपासून बचाव होतो.

* पोटासंबंधीत आजार

पावसाळ्याच्या दिवसांत अनेकांना पोटाचे आजार उद्भवतात. कारण या दिवसांत पाणीसुद्धा दूषित होते. यामुळे पाणी उकळून प्यावे. तसेच शिळे आणि स्ट्रीट फूड खाणे टाळावे. यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते.

Monsoon Infection
Health Tips: आयुर्वेदिक काढ्याच्या मदतीने वाढवा आपली रोगप्रतिकारक शक्ती

* या फळांचे सेवन करावे

पावसाळ्याच्या दिवसांत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासतही सकस आहार घ्यावा. हिरव्या पालेभाज्या, पपई, मिरची, आंबा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, इत्यादी पदार्थांचा समावेश करावा.

* शीतपेय टाळावे

पावसाळ्याच्या दिवसांत वातावरणात फरक पडतो. कमी पाऊस पडल्यास तापमान वाढते तर पाऊस अधिक पडल्यास तापमान कमी होते. यामुळे अशा वातावरणात थंड पदार्थ खाणे टाळावे. जसे की, आइसक्रीम, दही, यासारखे पदार्थ खाणे टाळावे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com