मैत्री, वागणुक अन् हसू वाढवतील तुमचं आयुष्य

चांगली झोप, खाण्याच्या चांगल्या सवयी आणि नियमित व्यायाम हे दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे घटक आहेत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही.
Friendships behaviors and smiles will increase your life
Friendships behaviors and smiles will increase your lifeDainik Gomantak

चांगली झोप, खाण्याच्या चांगल्या सवयी आणि नियमित व्यायाम हे दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे घटक आहेत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की, माणसांचे एकमेकांशी चांगले वागणे माणसाचे आयुष्य वाढण्यात मदत होऊ शकते. कोलंबिया विद्यापीठातील प्रमाणित मानसोपचारतज्ञ डॉ. केली हार्डिंग असे म्हणतात की, चांगले व्यक्तिमत्त्व असण्याचा आणि इतरांशी दयाळू वागण्याचा शरीरातील आनंदी संप्रेरकांवरती होणारा परिणाम, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य सुमारे 7 वर्षांनी वाढू शकते. (Friendships behaviors and smiles will increase your life)

Friendships behaviors and smiles will increase your life
12वी नंतर करा 'हा' कोर्स, परदेशातही मिळेल लाखोंची नोकरी

त्यांच्या 'द रॅबिट इफेक्ट' या पुस्तकात डॉ. हार्डिंग यांनी असा दावा केला आहे की मानवी दयाळूपणाचा त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवरती आणि रक्तदाबावर सकारात्मक परिणाम होतो. परिणामी लोक चांगले आणि दीर्घ आयुष्याचा आनंदही घेऊ शकतात. तसेच 'जेम्स एलिस न्यूट्रिशन'चे आरोग्य प्रशिक्षक जेम्स एलिस यांचेही असेच म्हणणे आहे. आरोग्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की चांगले वागल्याने आपला रक्तदाब आणि तणावाची पातळी कमी होते, ज्यामुळे तुमचे वृद्धत्वही वाढते. मानवी वृद्धत्वाची आणखी अनेक रहस्ये सांगण्यात आली आहेत.

चांगले मित्र बनवा - चांगले मित्र (Friendship) आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की मजबूत नातेसंबंध आणि सामाजिक आधार असलेल्या व्यक्तीच्या जगण्याची शक्यता कमी कनेक्शन असलेल्या व्यक्तींपेक्षा 22 टक्के जास्तच असते. मित्र केवळ चांगले क्षण एकत्र साजरे करत नाहीत तर वाईट काळातही मदतीसाठी धावुन येतात. घटस्फोट किंवा गंभीर आजारादरम्यान येणारा ताण कमी करण्याचा प्रयत्न मित्रच करतात.

Friendships behaviors and smiles will increase your life
लोकं Fish Oilच्या गोळ्या का खातात?

चांगली वागणूक - इतरांना मदत करणे आणि त्यांना वेळ देणे याचाही आपल्या आरोग्यावर (behavior) चांगला परिणाम होत असल्याचे अमेरिकेतील शास्त्रज्ञांना आढळून आले. 2013 मध्ये, 846 लोकांवर पाच वर्षे केलेल्या अभ्यासाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.

खूप हसणे - हसण्याने (smile) आपला मेंदूची क्षमता वाढतेच, पण कॉर्टिसोल आणि एंडोर्फिन सारख्या हार्मोन्सच्या उत्सर्जनामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्तदाबही योग्य राहतो. मिशिगन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 2010 मध्ये केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की जे लोक खूप हसतात ते सरासरी 79.9 वर्षांपर्यंत जगतात. तर त्यांच्यापेक्षा थोडे कमी हसणाऱ्या लोकांचे सरासरी वय 75 वर्षे आहे. त्याच वेळी, जे लोक अजिबात हसत नाहीत ते सर्वात कमी 72.9 वर्षांपर्यत जगतात.

या 3 गोष्टी देखील लक्षात ठेवा - इतरांच्या मदतीसाठी नेहमी पुढे राहणे, स्वतःशी चांगले राहणे आणि चांगला श्रोता बनणे याचाही माणसाच्या आरोग्यावरती आणि वयावर चांगला परिणाम होतो. बोस्टन स्कूल ऑफ मेडिसिन (US) द्वारे आयोजित 2019 च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की सकारात्मक मानसिक वृत्ती आपले आयुर्मान 11 ते 15 टक्क्यांनी वाढवू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com