ही फळं आणि भाज्या ऑक्सीजनने समृद्ध

रोजच्या आहारात पोषक घटकांचा (Nutrients) समावेश केला तर ऑक्सीजनची कमतरता भरून कमी होते.
ही फळं आणि भाज्या ऑक्सीजनने समृद्ध
Fruits and vegetables contain lot oxygenDainik Gomantak

शरीरातील पेशींची निर्मिती आणि कार्य ऑक्सीजनवर (Oxygen) अवलंबून असते. अनेक लोकांमध्ये ऑक्सीजनच्या कमतरतेची समस्या असते. यांची अनेक कारणे असू शकतात. जर तुम्ही रोजच्या आहारात पोषक घटकांचा (Nutrients) समावेश केला तर ही समस्या दूर होऊ शकते. सर्वसाधारण ऑक्सीजन (Oxygen) हिरव्या भाज्या, फळे(fruits) , बियाणे, मोड आलेले कडधान्य यासारख्या पदार्थांमध्ये असते. ही सर्व पदार्थ आपल्या आरोग्यासाठी (Health) लाभदायी असते. चला तर, मग जाणून घेवूया अशा फळ आणि भाज्याबद्दल ज्यामध्ये ऑक्सीजनची पातळी (Oxygen level) अधिक असते.

* पालक

पालकामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. शिवाय ही लोह शरीरातील ऑक्सीजनचा पुरवठा वाढवण्यास मदत करते. तसेच पालकाचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश केल्यास मेंदू आणि स्नायू खूप चांगले काम करतात.

* एवोकॅडो

एवोकॅडो जीवनसत्वे आणि खनिजे समृद्ध असतात, जे मेंदूला रक्त आणि ऑक्सीजनच्या प्रवाहात मदत करतात. जर एखाद्याला ऑक्सीजनची कमतरता असेल तर त्यांनी ते खावे.

* शिमला मिर्ची

शिमला मिर्चीमध्ये अँटिऑक्सिडंट्ससह, व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. तसेच शिमला मिर्चीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे आपल्या शरीराला आवश्यकतेनुसार ऑक्सीजन मिळण्यास मदत होते. यातील पोषक घटक पचनसंस्थचे कार्य सुरळीत ठेवते.

Fruits and vegetables contain lot  oxygen
शरीराला डिहायड्रेट ठेवण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश

* रताळे

रताळे ही एक कंदमूळ आहे. यात अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायी असतात. रातळ्याचा आपल्या आहारात समावेश केल्यास शरीरातील ऑक्सीजनची कमतरता भरून निघते.

* टरबूज

टरबुजमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. तसेच त्याचे पीएच मूल्य देखील खूप जास्त आहे. यात बीटा कॅरोटीन आणि लाइकोपीन असते जे आपल्या शरीराची ऑक्सीजनची पातळी वाढण्यास मदत करते.

* लिंबू

लिंबू ऑक्सीजनची कमतरता दूर करण्यासाठी प्रभावी ठरतो. लिंबामध्ये पोटॅशियम आणि डी जीवनसत्वे असते. जे मेंदूला सक्रिय ठेवते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com