Ganesh Chaturthi 2021: आई...देव बाप्‍पा आले!

कोविडचे संक्रमण अजून संपले नसल्याने चतुर्थीच्या काळात नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे.
Ganesh Chaturthi 2021: आई...देव बाप्‍पा आले!
Ganesh Chaturthi 2021: आई...देव बाप्‍पा आले!Dainik Gomantak

गोवा: गणेशोत्सवानिमित्त (Ganesh Chaturthi) घरोघरी गणरायांचे आगमन होऊ लागले आहे. कोविडच्या (Covid-19) सावटाखाली चतुर्थी साजरे होणारे हे दुसरे वर्ष आहे. गणेशभक्तांमध्‍ये चतुर्थीचा उत्साह मात्र कायम आहे.

Dainik Gomantak

समस्‍त गोमंतकीयांचा आवडता गणेशोत्सव यंदा शुक्रवार दि. 10 सप्‍टेंबरपासून सुरू होत आहे. 19 सप्‍टेंबर अनंत चतुर्थीपर्यंत तो सुरू राहणार आहे. यात दीड, पाच, सात, नऊ व अकरा दिवसांचा उत्‍सव असेल. मात्र कोरोनामुळे मोठ्या कार्यक्रमांना फाटा देण्यात आला आहे. चतुर्थीनिमित्त 10 सप्टेंबर रोजी घरोघरी व सार्वजनिक पारंपरिक पद्धतीने मूर्तींचे पूजन होणार आहे. कोविडचे संक्रमण अजून संपले नसल्याने चतुर्थीच्या काळात नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे.

Dainik Gomantak

गेल्या वर्षी कोविड माहामारीमुळे अनेकांना आर्थिक फटका बसला. मोठ्या उंचीच्या गणेशमूर्ती ऐवजी भक्तांनी लहान मूर्तींना प्राधान्य दिले. यंदाही काही अंशी तशीच परिस्‍थिती असली तरी भाविकांमध्‍ये उत्‍साह असल्‍याचे दिसून येत आहे. घरोघरी मूर्तींचे आगमन होऊ लागले असून बाप्‍पांचे स्‍वागत करण्‍यात येत आहे.

Ganesh Chaturthi 2021: आई...देव बाप्‍पा आले!
Ganesh Chaturthi 2021: गणपतीला "दूर्वा" का वाहता?

* बाप्‍पासाठी घासाघीस न करता भाविकांकडून होतेय खरेदी

राज्‍याच्‍या इतर भागांप्रमाणेच काणकोणातही माटोळीचा बाजार सजला आहे. श्री मल्लिकार्जुन देवाचे भजक पंचमीला नव्याचा सण साजरा करतात. नवधान्य बांधण्यासाठी केवणीच्या दोऱ्या व काठीची गरज असते. त्यासाठी या केवणीच्या काठ्या व दोर बाजारात विक्रीसाठी येतात. माटोळीचे माट्टी, कुड्याचे कात्रे व अन्य माटोळीच्या सामानाचे दर वाढलेले आहेत. मात्र गणेशभक्त कोरोना महामारीतही कोणतीच घासाघीस न करता माटोळीच्या सामानाची खरेदी करत आहेत. दुसरीकडे पावसाचेही सावट आहे. तरीसुद्धा गणेशभक्तांचा उत्‍साह तसूबरही कमी झालेला नाही. त्यामुळे आज बुधवारी काणकोण बाजारात गणेशभक्तांची खरेदीसाठी गर्दी उसळली होती.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com