Ganesh Chaturthi 2021: बाप्पांच्या स्वागतासाठी सोप्या Decoration Ideas

गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी या आहेत सोप्या आणि सुंदर सजावटीच्या कल्पना
Ganesh Chaturthi 2021: बाप्पांच्या स्वागतासाठी सोप्या Decoration Ideas
Ganesh Chaturthi: Here are simple decoration ideas for you Dainik Gomantak

गणपती बाप्पांचे आगमन अवघ्या काही दिवसांवर होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पांला मोठ्या भक्ती भावात घरी आणण्यासाठी सर्व जण आतूर झाले असून, बाप्पांच्या सजावटी, प्रसादाचे पदार्थ याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. चला तर मग जाणून घेवूया बाप्पांच्या स्वागतासाठी सजावटीच्या सोप्या आणि सुंदर कल्पना.

* डेकोरेटिव लाईट्स

डेकोरेटिव लाईट्सचा सजावटीसाठी तुम्ही वापर करू शकता. डेकोरेटिव लाईट्स बाजारात उपलब्ध आहेत. बाप्पाच्या सजावटीमध्ये डेकोरेटिव लाईट्स आकर्षक ठरतात. तुम्ही डेकोरेटिव लाईट्स बॅकग्राऊंडला किंवा खिडक्यांवर हार म्हणून लावू शकता.

Ganesh Chaturthi: Here are simple decoration ideas for you
Ganesh Chaturthi 2021: मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा

* फुलांनी सजावट

गणपती बाप्पाची पूजा फुलांशिवाय अपूर्ण मनाली जाते. गणपती बाप्पाला लाल जास्वंदाचे फूल प्रिय आहे. तुम्ही जर या फुलांची सजावटीसाठी वापर केला तर बाप्पाचे मंदिर अधिक आकर्षक दिसेल. तसेच फुलांचा एक नैसर्गिक सुगंध घरात सर्वत्र पसरतो. फुलांची सजावट हा एक सोपा आणि सुंदर पर्याय आहे.

* रांगोळीची सजावट

घराच्या मुख्य प्रवेश दाराबाहेर विवध रंगांची सुंदर रंगोळी काढू शकता. तसेच तुम्ही गणपती बाप्पाच्या समोर फुलांची सुंदर रांगोळी सुद्धा काढू शकता. रंगोळीमुळे सजावटीमध्ये अधिक भर पडते. भारतात प्रत्येक सणाला रांगोळी काढणे शुभ मानले जाते.

Ganesh Chaturthi: Here are simple decoration ideas for you
Ganesh Chaturthi 2021: गोव्यात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींची तपासणीच नाही

* फुग्याची सजावट

तुम्हाला जर फुग्याची सजावट करायला आवडत असेल तर तुम्ही विविध रंगांचे फुगे गणपती बाप्पाच्या मंदिराला किंवा बॅकग्राउंडला लावू शकता. फुग्याच्या सजावटीमुळे एक वेगळेच स्वरूप मिळेले.

* ओरिगेमी शीटने सजावट

तुम्ही ओरिगेमी शीटचा वापर करून गणपती बाप्पाच्या मंदिराची सजावट करू शकता. कागदापासून बनवलेली शीट सुंदर आणि पर्यावरणास अनुकूल आहेत. तुम्ही ओरिगेमी शीटचा वापर करून मंदिरांसाठी रंगीबिरंगी फुले तयार करू शकता.

Ganesh Chaturthi: Here are simple decoration ideas for you
Ganpati Chaturthi 2021: आपल्या लाडक्या बाप्पासाठी श्रीखंड, बासुंदी अन् मोदकाचा प्रसाद...

* दिव्यांनी सजावट

भारतात कोणताही उत्सव असला की दिव्यांनी सजावट केली जाते. दिव्यांनी सजावट केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या वर्षी तुम्ही बाप्पाच्या आगमनासाठी दिव्यांची सजावट करू शकता. यामुळे तुमच्या घराला एक युनिक लुक मिळेल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com