Ganesh Chaturthi: गोंयचो घुमट आरती

गोव्यात घुमट आरतीशिवाय गणेश चतुर्थी पूर्णच होत नाही.
Ganesh Chaturthi: गोंयचो घुमट आरती
Ganesh Chaturthi: गोंयचो घुमट आरती Dainik Gomantak

गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) म्हंटले की गोवेकरांच्या आनंदाला उधाणच येतो, गोव्यातील सर्वात महत्वाचा आणि प्रमुख मानला जाणारा सण. म्हणजेच गणेश चतुर्थी, गोव्यातील गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) एक वेगळे महत्व आहे, या निमित्ताने त्याने अनेक परंपरा जोपासून आपले वेगळेपण अगदी आजही जपून ठेवले आहे. याच वेगळेपणामुळे गोव्यातील गणेश चतुर्थीला महत्व प्राप्त होते. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गोवेकरांच्या अनेक कला आपल्याला सांस्कृतिक देखाव्यातून तसेच घुमट आरती मधून बघायला मिळते. घुमट आरती शिवाय गोव्यातील गणेश चतुर्थी पूर्णच होत नाही. गणेश चतुर्थीच्या कळात अगदी नेमाने रोज घुमट आरती गोव्यात एकेला मिळते.

आता घुमट आरती म्हणजे काय प्रश्न पडला असेल तर घुमट हे वाद्य आहे. त्याचा एक विशिष्ट ताल धरून म्हटली जाणारी घुमट आरती. ही आरती म्हणण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. घुमट हे मुळात एक मातीचे मडके असते, पण त्याच्या दोन्ही बाजू उघड्या असतात. दोन खुल्या बाजूपैकी एका बाजूने घोरपडीचे चांबडे लावून बंद करतात, व त्याच चांबड्यावर ठेक्यात वाजवल्यास छान प्रकारे आवाज येतो. घुमट हे गोव्याचे स्टेट वाद्य आहे.

Ganesh Chaturthi: गोंयचो घुमट आरती
पुरुषांची मक्तेदारी बनली या मुलींची आवड

सत्तरी तालुक्यातील मोर्ले - कासारवाडा येथील एका महिला मंडळाने घुमट आरत्या शिकल्या असून दर चतुर्थीत आपल्या वाड्यावरील घरोघरी जाऊन पुरुषांच्या बरोबरीने महिलाही आरत्या करतात हे विशेष, गोव्यात प्रामुख्याने सर्वत्र घुमट आरतीच होतात.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com