Ganesh Chaturthi: बाप्पांना मोदक का अवडतात?

बाप्पांना मोदक का अवडतात? यामागे काय कारण असेल याचा शोध तुम्ही घेतला का
Ganesh Chaturthi: बाप्पांना मोदक का अवडतात?
Ganesh Chaturthi: बाप्पांना मोदक का अवडतात?Dainik Gomantak

गणरायाचे (Ganapti Bappa) जल्लोषात आगमन झाले आहे. सर्वत्र मंगलमय वातावरण तयार झाले आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला मोदकाचा (Modak) नैवेद्य दाखवला जातो. पण बाप्पांना मोदक का प्रिय आहे असा प्रश्न कधी तुम्हाला पडला का? बाप्पाला आपण पिजा आणि मॅगी नैवेद्य म्हणून का दाखवत नाही. यामागे काय कारण असेल याचा शोध तुम्ही घेतला का? चला तर मग आज जाणून घेवूया मोदकामागील रोचक गोष्ट

Ganesh Chaturthi: बाप्पांना मोदक का अवडतात?
Goa Ganpati Festival: राण्यांच्या जुव्याचा गणपती

14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती असलेले गणपती बाप्पा भगवान शिव झोपले असल्याने त्यांच्या दारावर पहारा देत होते. जेव्हा परशुराम महादेवाच्या भेटीसाठी तिथे पोहोचले तेव्हा गणपती बाप्पानी त्यांना अडवले. परशुरामाला राग आल्याने गणपती बाप्पा सोबत युद्ध पुकारले. या युद्धात गणपती बाप्पाचा एक दात तुटला . यामुळे गणपती बाप्पाला काहीही खाणे त्रासदायक होऊ लागले, तेव्हा त्यांच्यासाठी मोदक तयार करण्यात आले. मोदक मऊ असतात आणि खाताना त्रास होत नाही. गणपती बाप्पाने पोटभर मोदक खाल्ले. तेव्हापासून मोदक गणपती बाप्पाला प्रिय आहे.

* मोदक म्हणजे आनंद देणारा

मोद म्हणजे आनंद देणारा. मोदक खाल्ल्याने मन आनंदी होते. शास्त्रानुसार गणपती बाप्पाना आनंदी राहणारे देव म्हंटले जाते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com