Ganesh Utsav 2021: जाणून घ्या पुजा मुहूर्त आणि विसर्जनाची तारीख

देशभरात गणेश चतुर्थीची तयारी सुरू झाली आहे.
Ganesh Utsav 2021: जाणून घ्या पुजा मुहूर्त  आणि विसर्जनाची तारीख
Ganesh Utsav 2021: जाणून घ्या पुजा मुहूर्त आणि विसर्जनाची तारीख Dainik Gomantak

देशभरात गणेश चतुर्थीची तयारी सुरू झाली आहे. आपल्या लाडक्या बाप्पांला मोठ्या भक्ती भावात घरी आणण्यासाठी सर्व जण आतूर झाले असून, बाप्पांच्या सजावटी, प्रसादाचे पदार्थ याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. या 10 दिवसांत बाप्पांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ प्रसाद म्हणून देण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. पंचागानुसार सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थी कधी (Ganesh Chaturthi)आहे ही जाणून घेवूया.

Dainik Gomantak

* पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा सण 10 सप्टेंबर 2021, शुक्रवारी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी नक्षत्र राहील आणि ब्रम्ह योग असतो.

* गणेश चतुर्थी 2021 कधी सुरू होईल?

या वर्षी गणेश उत्सव 10 सप्टेंबर 2021 पासून सुरू होणार आहे. आणि पंचांगानुसार, गणेश उत्सव 19 सप्टेंबर 2021 रविवार, भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षाच्या चतुर्थीच्या तारखेला संपणार आहे. गणेश उत्सव 10 दिवस साजरा केला जातो.

Ganesh Utsav 2021: जाणून घ्या पुजा मुहूर्त  आणि विसर्जनाची तारीख
Ganesh Chaturthi 2021: आई...देव बाप्‍पा आले!

* गणेश चतुर्थीचे महत्व

पौराणिक श्रद्धा अशी आहे की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या तिथीला गणपती बाप्पाची आई पार्वतीसह कैलास पर्वतावरुण आले होते. म्हणूनच हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. स्कंद पुराण, नारद पुराण आणि ब्रम्ह वैवर्त पुराणात गणपतीचे वर्णन आढळते. गणपती बाप्पा हे बुद्धी देणारे आहेत. यासह गणपती बाप्पाला विघ्नहर्ता असेही म्हणतात. विघ्नहर्ता म्हणजे दुख हरणारा. हा उत्सव विनायक चतुर्थी आणि विनायक चविटी या नावाने सुद्धा ओळखले जाते.

* गणेश चतुर्थी 2021

* गणेश चतुर्थी - 10 सप्टेंबर

* गणेश चतुर्थी पुजा मुहूर्त - 10 सप्टेंबर 12:18

* गणेश चतुर्थी समाप्ती - 10 सप्टेंबर रात्री 09:57

* अनंत चतुर्थी - 19 सप्टेंबर 2021

* गणेश विसर्जन - 19 सप्टेंबर 2021

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com