गणपती बाप्पा मोरया ... मंगलमूर्ती मोरया ...!

- अपूर्वा सांबरेकर
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

जे दुसऱ्या राज्यात स्थायिक आहेत त्यांना आपल्या घरी जाता आले नाही. जे गेले त्यांना "क्वारंटाईन' केले गेले. अशाने थोडी निराशा झाली हे खरंय. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच जातोय.

जे दुसऱ्या राज्यात स्थायिक आहेत त्यांना आपल्या घरी जाता आले नाही. जे गेले त्यांना "क्वारंटाईन' केले गेले. अशाने थोडी निराशा झाली हे खरंय. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच जातोय. अमुक लोक बरे झाले की त्याच्या दुप्पट लोक कोरोना संक्रमित असल्याचे समोर येते. त्यामुळे मनात कुठेतरी भीती आहेच. परंतू सर्व गणेश भक्तांचा विश्वास आहे की तो कोरोनाचे हे विघ्न दूर करेल आणि याच विश्वासाने अधिक जोमाने सर्वजण गणेशाची आराधना करताहेत. 

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीपासूनच असा गजर सर्वत्र सुरू झाला होता. गणपती बाप्पा म्हणजे लहानांपासून ते थोरामोठ्यापर्यंतचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. वर्षभर बाप्पा घरी येण्याची वाट बघणं आणि गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आतुरता शिगेला पोहोचणं ही जीवनातील घडी फार सुंदर असते.

चतुर्थीच्या चार दिवसां अगोदर पासूनच घराघरात उत्साहाचे वातावरण असलेले पहायला मिळते. लहान मुलं "आमगेर गणपती बाप्पा येतोलो' म्हणून सर्वत्र बागडत असतात. वर्षभरात येणाऱ्या सणांपैकी सर्वात आनंदाचा आणि उत्सवाचा सण म्हणजे गणेश चतुर्थी.

पण यावर्षी या सणावर कोरोनाचं सावट आहे. स्वत:मध्ये दांडगा उत्साह असूनही मनमोकळेपणे बाहेर वावरणं कठीण झालं आहे. 

यावर्षी कोरोनामुळे सर्वच "ऑनलाईन' झाल्यामुळे गणेश पूजाही भटजीच्या अनुपस्थितीत पार पडली. सर्वच गणेश भक्तांना आपल्या मनाला मुरड घालावी लागली. जे दुसऱ्या राज्यात स्थायिक आहेत. त्यांना आपल्या घरी जाता आले नाही. जे गेले त्यांना "क्वारंटाईन' केले गेले. अशाने थोडी निराशा झाली हे खरंय.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच जातोय. अमुक लोक बरे झाले की त्याच्या दुप्पट लोक कोरोना संक्रमित असल्याचे समोर येते. त्यामुळे मनात कुठेतरी भीती आहेच. परंतू सर्व गणेश भक्तांचा विश्वास आहे की तो कोरोनाचे हे विघ्न दूर करेल आणि याच विश्वासाने अधिक जोमाने सर्वजण गणेशाची आराधना करताहेत. 

बातम्यांमधुन पहायला ऐकायला येतं की लोकांची खरेदीसाठी बाजारात गर्दी आहे. इथे लोकांचा उत्साह दिसून येतो. या वर्षीच्या गणेशाचे बहुतेकजण ऑनलाईन दर्शन घेत आहेत. ऑनलाईन आरतीमध्ये सहभागी होत आहेत. फक्त आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन होण्यावरही गणेशभक्त समाधान मानत आहेत. मग ते ऑनलाईन असलं तरीही. अनेक ठिकाणी इकोफ्रेंडली गणेशाची प्रतिष्ठापना केली गेली. त्यानिमित्ताने पर्यावरणाचाही विचार केला गेला. असाच पर्यावरणाचा विचार यापुढेही केला तर निसर्गदेवतेचाही वरदहस्त लाभेल. त्यामुळे यावर्षीची गणेश चतुर्थी काही प्रमाणात पर्यावरणाच्या दृष्टीने चांगली गेली असे म्हणावयास हरकत नाही.

संबंधित बातम्या