कांचनाधिपती गणपती

गेली सुमारे बारा वर्षे साधले कुटुंबीयांचा गणपती शुद्ध सोन्याने सजतो आहे.
कांचनाधिपती गणपती
कांचनाधिपती गणपतीDainik Gomantak

साल 2009 संदेश साधले यांच्या हातात देवाच्या माथ्यावरचे फुल प्रसादासारखे पडते. त्यांना तो शुभ संकेतच वाटतो. कर्म धर्म संयोगाने त्यांची तोपर्यंत अडून राहिलेली कामे ही पूर्णत्वास येतात. त्याच वेळी ते मनाशीच संकल्प करतात की दर महिन्याला पैसे वाचवून चतुर्थीत घरी येणाऱ्या घरच्या गणपतीला ते सोन्याचे दागिने वाहतील आणि तेव्हापासून कवळे इथल्या साधले कुटुंबियांच्या घरच्या गणपतीवर कुटुंबियांकडून सोन्याचे साज चढू लागले.

गेली सुमारे बारा वर्षे साधले कुटुंबीयांचा गणपती शुद्ध सोन्याने सजतो आहे. या साजात दरवर्षी नवीन नवीन भरही पडत असते. यावर्षी गणपतीच्या अंगावर सोन्याने मढवलेली नवीकोरी शाल त्याच्यापुर्वापार साजावर अधिकच शोभत होती.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com